चांदवड:- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती २०२५, चांदवड तालुक्याची बैठक शासकीय विश्रामगृह, चांदवड येथे काल दि.०१ एप्रिल रोजी पार पडली. या बैठकीत चांदवड तालुक्यातील समस्त फुले प्रेमी यांनी सार्वजनिकरित्या चांदवड येथे महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्याचे एकमताने ठरवले. यावेळी समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते वाहेगांवसाळ येथील युवा सामाजिक कार्यकर्ते श्री.निलेश खैरे, उपाध्यक्षपदी तिसगांव येथील ॲड.भुषण संजय गांगुर्डे आणि गंगावे येथील किरण रघुनाथ आहेर, खजिनदार पदी दुगांव येथील सतिश आहेर तर सहखजिनदार पदी संदिप शेलार आदी पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी तालुक्यातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. प्रसंगी नुतन कार्यकारिणीचा चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.कैलास वाघ साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भव्यदिव्य स्वरूपात येत्या ११ एप्रिल रोजी सकाळी गणुर चौफुली, चांदवड येथे प्रतिमापूजन व संध्या.७ वा. बाजार तळ, चांदवड येथे तालुक्यातील फुलेप्रेमी, समाज बांधवांच्या उपस्थितीत जयंती उत्सव साजरा करण्याचे ठरले.
उल्लेखनीय बाब म्हणजे यावेळी तालुक्यातील नवनियुक्त सरपंच, सोसायटी चेअरमन, विविध संस्थांचे नवनवनिर्वाचित पदाधिकारी, उत्तुंग यश संपादन केलेले मुले-मुली यांचा सत्कार करून आगळ्यावेगळ्या स्वरूपात फुलेंच्या विचारावर सामाजिक संदेश जाईल असा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले.
बैठकीला सर्वश्री टी.पी.निकम सर, नंदकुमार मंडलिक,ह.भ.प. नवनाथ महाराज गांगुर्डे, शांताराम विठ्ठल गांगुर्डे, किशोर दशरथ शेलार, युवराज आहेर, विष्णु जाधव,बाजीराव खैरे, विजय जाधव, संजय खैरनार, हरिभाऊ सोनवणे, जी.डी.खैरनार,मुकेश आहेर, शुभम खैरे,सागर आहेर, संजय भिकाजी गांगुर्डे, अनिकेत गांगुर्डे, कैलास खैरे, निलेश गांगुर्डे, राहुल सोनवणे, योगेश बच्छाव, विकास शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन समितीचे मार्गदर्शक, पदाधिकारी यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments