चांदवडः राजघराण्यांच्या खाजगी संपत्तीचे संचालन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या अध्यक्षपदी महाराणी उषादेवी होळकर- मल्होत्रा या होत्या वयोमानानुसार निवृत्ती घेत त्यांनी घराण्याचा उत्तराधिकारी म्हणून भावाचे पुत्र युवराज यशवंतराव होळकर यांची खाजगी ट्रस्टच्या अध्यक्षपदी विराजमान केले आहे.
थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या बालपणात त्यांच्यावर आणि त्यांच्या आईवर आघात होत असतांना गावातील भावकी आणि सोयरे कामी पडले नाही शेवटी मल्हारबांच्या आईने कुणाकडे मदतीसाठी पदर न पसरता तीन चार वर्षाच्या बाळाला घेवून भावाचे घर गाठले.जहागीरदार भोजराज बारगळ यांना दोन मुलं नारायणराव आणि गौतमाबाई त्यांनी आपल्या बहिणीला अर्थात जीवाईंना आधार दिला जीवाईंनी भाऊ भोजराज यांच्या जहागिरीतील कामे करुन लाडक्या मल्हारबाचे लाड केले.
पुढे मामांच्या मदतीने मल्हारबा सुभेदार झाले सत्ता संपत्ती,सरंजाम मिळाल्यानंतर ते इंदौरला शाही राजवाड्यात राहण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी जन्मगावी होळमुरुमला जावून भावकीतील बेरोजगार भावबंदांना आणि गावातील, तसेच तलवार गाजवण्याची इच्छा असलेल्या सर्वांना इंदौरला घेवून गेले. ज्यांनी त्यांना व त्यांच्या आईवडीलांना त्रास दिला होता त्यांचेशी वैरभाव न ठेवता त्यांना शिलेदारी करण्याची संधी दिली.
सुभेदार तुकोजीराव होळकर (प्रथम) यांनी होळकर पंचभैय्या परंपरा राजघराण्यांत सुरू केली राजघराण्यातील मुख्य पुरुष मोहीमेवरुन असतांना घराण्यांच्या परंपरा,सन उत्सव,पुजा,अर्चा, श्राध्द वगैरे करण्यासाठी पंचभैय्या होळकर यांनी ते कार्य राजपुरुषांच्या वतीने करीत असे आजही होळकर पंचभैय्या परंपरा अविरतपणे सुरू आहे.
इंदौरला आज होळकर आडनावाची शेकडो लोक राहतात त्यामध्ये राजवंशानंतर होळकर पंचभैय्या घराण्यांस मान सन्मान आहे होळकरशाहीत सरदार,जहागिरदार म्हणून काम करणा-यानांही सन्मान दिला जातो.
तृतीय तुकोजीराव महाराज होळकर यांना द्वितीय यशवंतराव महाराज हे पुत्र असुन द्वितीय यशवंतराव महाराज यांच्या हयातीत स्वतंत्र भारताची निर्मिती झाली आणि देशातील सर्व संस्थाने खालसा करण्यात आले मात्र होळकर संस्थान देशाच्या एकीसाठी स्वतः हुन सामील झाले. शेवटच्या दरबारात द्वितीय यशवंतराव महाराज यांनी इंदौर संस्थानच्या प्रजेला तसेच संस्थानच्या पोलीस, महसूल, अर्थ,सैनिक, हाऊसहोल्ड विभागाला उद्देशून भाषण करतांना सांगितले की ज्या ज्या वेळी देशाला मदतीची गरज असेल त्या त्या वेळी सर्वात प्रथम आपण मदतीसाठी उभे राहिले पाहिजे. आम्ही राजपाट त्यागुन या देशाचे नागरिक झालो आहोत देशाच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत राजघराण्यांची ज्यांनी ज्यांनी ज्ञात अज्ञातपणे सेवा केली त्या सर्वांचा सन्मान तसेच भविष्यातील वाटचालीची यथाशक्ती तरतूद केलेली आहे. अर्थात सर्वांना आर्थिक मदत राहण्यासाठी घर,स्थापन केलेल्या अनेक संस्थांना आर्थिक मदत केली.
द्वितीय यशवंतराव महाराज यांना महाराणी युफेमिया यांचेपासुन शिवाजीराव तर चंद्रप्रभा महाराणी यांचेपासुन उषादेवी असे दोन वारसदार आहेत जे होळकर राजघराण्यांचे मानमर्ताब,परंपरा, संस्कृतीचे पालन करतात. राजकुमार शिवाजीराव होळकर यांना लाडाने रिचर्ड महाराज महाराज म्हटले जाते. शिवाजीराव महाराज यांना यशवंतराव तृतीय हे पुत्र असुन ते राजघराण्यांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खाजगी ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आहेत तसेच त्यांच्याकडे महेश्वर येथील गादीचे जबाबदारी असुन राजघराण्यांच्या परंपरेनुसार ते देशभर सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक कार्यक्रमांना उपस्थित असतात त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा अवगत असुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि थोरले सुभेदार मल्हारराव होळकर ,महाराजा यशवंतराव होळकर तसेच राजघराण्यांच्या इतिहास आणि सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरेची त्यांना इतंभूत माहिती आहे.
तृतीय यशवंतराव शिवाजीराव होळकर महाराज वेळोवेळी सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहतात वर्षातून दोनदा ते कुळदैवत श्री मल्हारी मार्तडांच्या दर्शनाला जातात परंपरेनुसार कुळाचार कुळधर्म पार पाडतात यावेळी जेजुरी येथील होळकरांचे वंशपरंपरागत असलेले राजपुरोहित खाडे हे हजर असतात.
यशवंतराव महाराज हे उच्चकुलीन असुन ते नेहमीच मर्यादा, संयम,ठेवून वागतात कुठेही बडेजाव करीत नाही.
यशवंतराव महाराज यांच्या मातोश्री अखंड सौभाग्यवती श्रीमंत शालिनीदेवी होळकर यांना भारत सरकारने नुकतेच मानाचा पद्मश्री पुरस्कार बहाल केलेला आहे.
शालिनीदेवी यांनी गेल्या पन्नास वर्षापासून महेश्वरी साडी पुनःजीवन करण्याचे कार्य करीत आहेत.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महेश्वर येथे महेश्वरी साडी उद्योगाची सुरवात केली होती माळव्यातील महिलांना रोजगार निर्माण व्हावा तसेच या उद्योग व्यवसायातून बाजारपेठ निर्माण व्हावी यासाठी महेश्वरी साडीची निर्मिती केली होती.हातमागावर रेशीम पासून महेश्वरी साडी तयार करण्यात येते.
युवराज यशवंतराव हे आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार महेश्वरी साडी व हातमाग व्यवसाय पाहतात तसेच देशभर निर्माण केलेल्या होळकर राजघराण्यांच्या वास्तु संवर्धन जतन करण्यासाठी ते प्रयत्नशील असुन खाजगी ट्रस्ट होळकर राजघराण्यांच्या शाही संपत्ती व्यतीरीक्त खाजगी मिळकतीतून धार्मिक कार्यासाठी निर्माण केलेली विश्वस्त संस्था आहे.
महाराजा यशवंतराव होळकर द्वितीय यांनी स्थापन केलेल्या या खाजगी ट्रस्टच्या अध्यक्षपदी आत्तापर्यंत त्यांच्या कन्या महाराणी उषादेवी होळकर या होत्या वयोमानानुसार त्यांचेनंतर खाजगी ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून युवराज यशवंतराव शिवाजीराव होळकर (तृतीय) यांची निवड झाली असुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा वारसा ते चालवतील
Post a Comment
0 Comments