चांदवड :-- मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मंगरूळ येथे टोल प्लाजा कंपनी च्या कर्मचाऱ्यांचे अनेक दिवसांपासून अनेक प्रश्न प्रंलबित होते यासाठी अनेकवेळा विविध मागण्या संदर्भात आंदोलन केले होते .परतु या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम व कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे काम प्रहार पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश भाऊ निंबाळकर यांनी आंदोलन करून या कामगारांना न्याय मिळवून दिला त्या अनुषंगाने या टोल प्लाझा कंपनीतील80ते 100 कामगारांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरवले व जिल्हाप्रमुख गणेश भाऊ निंबाळकर यांच्या हस्ते प्रहार टोल कामगार संघटना शाखेच्या फलक अनावरन करून उद्घाटन केले. यावेळी प्रहार चे तालुकाध्यक्ष
प्रकाश चव्हाण ,चंद्रकांत जाधव, टोल सुपरवायझर संजय पाटील, शिवाजी थोरमिसे,लेन्स सुपरवायझर तानाजी भोसले, श्रावण गांगुर्डे, हर्षल थोरमिशे, शशिकांत थोरमिशे, अनिल पवार, अजय पाटील, विठ्ठल सोनवणे, विशाल चव्हाण ,सोपान पवार ,बापू जाधव, सखाराम गांगुर्डे, गणेश कासव. आदि उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments