चांदवड -श्री.छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयातील मुख्याध्यापक श्री तुळशीराम महादू पेंढारी यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात शाळेमध्ये पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे पहिले माजी मुख्याध्यापक सदाशिव पुंजाजी शेडगे हे होते. तसेच व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ,उपाध्यक्ष दत्तात्रय गांगुर्डे, चिटणीस अण्णासाहेब गांगुर्डे, शाळा समिती अध्यक्ष साहेबराव गांगुर्डे,शाळेचे शिक्षक व विद्यमान संचालक सदाशिव गांगुर्डे, संचालक नानाभाऊ गांगुर्डे, निवृत्ती मापारी,अशोकराव ठाकरे, सरपंच रावसाहेब गांगुर्डे,संस्थेचे माजी चिटणीस पोपटराव गांगुर्डे,संस्थेचे माजी अध्यक्ष अनिल गांगुर्डे, माजी संचालक लक्ष्मण गांगुर्डे, रामभाऊ गांगुर्डे,निवृत्ती गांगुर्डे, सभासद सिताराम गांगुर्डे, दिपक गांगुर्डे तसेच शाळेचे माजी विद्यार्थी गणेश निंबाळकर,संदीप जाधव,सागर गांगुर्डे,पत्रकार दशरथ ठोंबरे,कैलास सोनवणे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमण खुटे, सेवानिवृत शिक्षकआप्पा पवार, दगा पवार,रामकृष्ण चित्ते,सुधाकर बोरसे,श्रावण घोलप,पंचायत समितीचे माजी सभापती अनिल काळे,केंद्रप्रमुख निवृत्ती बच्छाव,सर्जेराव ठोके तसेच सरांच्या सुविद्य पत्नी सविता पेंढारी आदी उपस्थित होते.
कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वरी घालितो तो धपाटा, आत आधाराचा हात...! आधी तुडवी तुडवी,मग हाते कुरवाळी,ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी, घट जाती थोराघरी,घट जाती राऊळात.....! घट प्रतिष्ठा पावती l गुरु राही अज्ञात l ह्या प्रसिद्ध कवी ग.दि. माडगूळकरांच्या कवितेतील काव्यपंक्तीप्रमाणे सरांनी आम्हाला घडविले असे अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी संदीप जाधव.गणेश निंबाळकर सागर गांगुर्डे,सुनिल गांगुर्डे शिक्षक सदाशिव गांगुर्डे,भाग्यश्री ठोके,हरिभाऊ ठाकरे शाळेचे विद्यार्थी श्रेया झाल्टे,शुभम मापारी इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. सरांच्या प्रदीर्घ सेवेतील आठवणींना उजाळा देताना अनेकांना आपल्या भावना अनावर झाल्या.अध्यक्षीय भाषणातून सदाशिव शेडगे यांनी सरांचा सुरुवातीपासूनचा संघर्षमय जीवनप्रवास सांगितला.या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेचे शिक्षक किशोर गांगुर्डे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक इंद्रभान देवरे, सुरेश सोनवणे,सदाशिव गांगुर्डे,किशोर गांगुर्डे,अर्जुन गांगुर्डे,शशिकांत पाटील, सुनिल गांगुर्डे,अमोल ठोंबरे, संदीप पाटील,गणेश गांगुर्डे, प्रभाकर पेंढारी,सुनिल चंदनशिव, रेणुका कानडे,कलूबाई साबळे, सुनीता राठोड,जयश्री भांमरे,रमा नगरारे,सागर गांगुर्डे धनंजय गांगुर्डे, मधुकर गोसावी,साहेबराव घोलप आदींनी प्रयत्न केले.
Post a Comment
0 Comments