Type Here to Get Search Results !

प्रा. डॉ. स्वप्नील वाघ सर यांच्या शोध ग्रंथाची पहिली प्रत चांदवड सार्वजनिक वाचनालयाला भेट

सदगुरु रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः प्रा. डॉ. स्वप्नील वाघ ( वनस्पती शास्त्रज्ञ / संशोधक ) यांनी आपल्या शोध ग्रंथाची पहिली प्रत चांदवडच्या सार्वजनिक वाचनालयाला भेट दिली. 
' जागतिक वन दिनाचे ' औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या वन-विभागाकडून " फिल्ड गाईड टू द फ्लावरिंग प्लांट्स ऑफ सातमाळा हिल्स नाशिक. "  या शोध ग्रंथाचे प्रकाशन व अनावरण मा. ना. गणेशजी नाईक (वनमंत्री) , श्री मिलिंद म्हैसकर (Chief Secretary of Forest, IAS), सोमिता बीश्वास (Head of Forest Force Maharashtra, IFS) यांच्या हस्ते करण्यात आले. 
सातमाळा डोंगर रांगांमधील समुद्रसपाटीपासून एक हजार मीटर पेक्षा उंच असणाऱ्या पठारांवरील ५०० पेक्षा जास्त दुर्मिळ दुर्लक्षित व प्रदेशनिष्ठ वनस्पतींची फोटोंसह माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे. वाचकांना नक्कीच ही माहिती उपयुक्त ठरेल. आपल्या भागातील डोंगर रांगांमध्ये सापडणाऱ्या वनस्पतींचा समृद्ध असा हा वारसा जतन करणे व त्याचे संवर्धन करणे यासाठी हा शोध ग्रंथ महत्वाचा आहे. सात वर्षांपूर्वी सातमाळ डोंगर रांगेत चालू केलेला हा प्रवास आज ग्रंथ स्वरूपात वाचकांना व अभ्यासकांना उपलब्ध व्हावा याहेतुने लेखक प्रा. डॉ. स्वप्नील वाघ सर यांनी चांदवड सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल नितीन शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 
 यावेळी प्रफुल्ल सोनवणे , रूपेश पवार , पिंटू राऊत , बाळा पाडवी ग्रंथालय सहाय्यक विशाल शेजवळ , मेघा निसाद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments