चांदवड : -श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ दिघवद,संचलीत स्वामी विवेकानंद विद्यालयातील शिक्षक तसेच संस्थेचे विद्यमान संचालक सदाशिव दोधू गांगुर्डे यांना नासिक जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोसायटीच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी शालेय शिक्षण मंत्री मा.ना.श्री.दादाजी भुसे,मा.खा.श्री.भास्कर भगरे, कृषी मंत्री,मा.ना.श्री.माणिकराव कोकाटे, सोसायटीचे माजी उपाध्यक्ष तसेच तालुका संचालक ज्ञानेश्वर ठाकरे सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ व कार्यक्रमाचे अध्यक्ष शांताराम पंडितराव देवरे या सर्व मान्यवरांच्या हस्ते दिनांक 6 एप्रिल रोजी रावसाहेब थोरात सभागृह नासिक येथे सन्मानित करण्यात येणार आहे. ह्या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष, चिटणीस व सर्व संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचे वतीने त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments