सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड:- श्री नेमिनाथ जैन विद्यालयात महिला दिनानिमित्त विद्यार्थीनींनी केले कराटे सादरीकरण.....श्री नेमिनाथ जैन विद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विद्यालयातील आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी सौ.लीना महाले होत्या यावेळी प्रमुख उपस्थिती निपुण माता गटातील सदस्य हेमलता ठाकरे,वर्षा देवरे, योगिता आहिरे उपस्थित होत्या.
याप्रसंगी योगिता आहिरे यांनी मनोगत व्यक्त करत प्रस्ताविक केले. तर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका दुर्गा शाकद्वीपी यांनी महिला सक्षमीकरणाचे गीत गायन केले.
विद्यालयातील उपशिक्षिका मंजुषा ओस्तवाल,सोनाली भामरे ,योगेश सोनजे यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगणारी मनोगते व्यक्त केली.
विद्यालयातील विद्यार्थिनी सायली केदारे व तिच्या चमूने कराटे सादरीकरण करत महिला सहभागी करण्याचा संदेश दिला. तर कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण लीना महाले यांनी केले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक योगेश जाधव यांनी केले.
Post a Comment
0 Comments