चांदवड : मराठा विद्या प्रसारक समाज संचलित, श्रीमती जे.आर गुंजाळ माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संजय लोहकरे,पर्यवेक्षक श्री गरुड के. के.विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. विद्यालयाचे उपशिक्षक नितीन ठाकरे यांनी प्रास्ताविक सादर केले व जागतिक स्तरावरील स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी जे प्रयत्न झालेत याविषयी त्यांनी माहिती दिली. यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री गरुड के. के. यांनी स्त्रियांचे सामाजिक शोषण, पूर्वीच्या प्रथा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या उत्थानासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. यानंतर सर्व महिलां शिक्षिकाचा सत्कार आणि सन्मान पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन करण्यात आला. विद्यालयाच्या उपशिक्षिका सविता दिवटे यांनी आधुनिक काळातील स्त्रियांचे जागतिक
स्थानाविषयी माहिती दिली. तसेच विद्यालयाचे प्राचार्य संजय लोहकरे यांनी आजच्या काळातील स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने कार्यरत आहेत . जागतिक कीर्तीच्या महिलांची उदाहरणे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना दिली. स्त्रिया सक्षम होणे ही आजच्या काळाची गरज आहे अशी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन ठाकरे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार श्री गरुड के. के. यांनी मानले. याप्रसंगी सर्व प्राध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू -भगिनी विद्यार्थी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments