Type Here to Get Search Results !

शासकीय आदिवासी मुलींच्या वसतीगृहात महिला दिन उत्साहात साजरा....

सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः याप्रसंगी प्रास्ताविक करत असताना , " मन , मेंदू , मनगट या त्रिसुत्रीचा विधायक , विचारपूर्वक , आणि योग्य वेळेस योग्य ठिकाणी अंगीकार जीवनात कराल तर जीवनात कधीही अपयश येणार नाही. आणि आपले जीवन सार्थकी लागेल."  असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुरेश पाटील सर यांनी केले.
   चांदवड येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सुरेश पाटील ,  सौ. संगीता पाटील , डॉ. सुमन गांगुर्डे , शैलजा जाधव पाटील ( लेखिका कवयित्री ) , के-मार्ट मॉल चे संचालक सौ. ज्योती क्षत्रिय व युवा उद्योजक श्री. किशोर क्षत्रिय , चित्रकार संजय पाडवी , सौ. सैंदणकर मॅडम , आदींनी मार्गदर्शन करत उपस्थिती नोंदवली.
 यावेळी भाषणात सौ. संगिता पाटील यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना... " राष्ट्रमाता जिजाऊ आणि श्यामची आई यांनी केलेले संस्कार , छत्रपती शिवाजी महाराज आणि श्यामची आई मधील साने गुरुजी हे उत्तम संस्कारक्षम व्यक्तिमत्व घडविले. असे संस्कार जर प्रत्येक स्त्रीने आपल्या कुटुंबाला दिले तर अजूनही भारतीय स्त्रीचे व्यक्तिमत्व उज्वल व आदरणीय वाटेल."  असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात लेखिका व कवयित्री सौ. शैलजा जाधव पाटील यांनी विद्यार्थिनींसोबत चर्चा करत अनेक स्त्रीवादी कविता सादर केल्या. व " भारतीय स्त्री परंपरा आणि संस्कारांची तिजोरी आजच्या महिलांनी स्वतःपासून कुटुंब आणि देशात रुजवली तर अजूनही आपली महान संस्कृती टिकून राहील असे प्रतिपादन केले. " व स्वतः लिहिलेले व प्रकाशित झालेले अनेक पुस्तकांचा संच विद्यार्थिनींना भेट दिला.
याप्रसंगी डॉ. सुमन नितीन गांगुर्डे यांनी विद्यार्थिनींचे वैद्यकीय व आरोग्य विषयक समुपदेशन केले. तसेच सैंदणकर मॅडम यांनी विद्यार्थिनींसोबत संवाद साधत अनेक ओव्या सादर केल्या. वसतीगृहातील विद्यार्थिनींनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर केले. 
      युवा उद्योजक किशोर क्षत्रिय व के-मार्कच्या संचालक ज्योती क्षत्रिय यांनी विद्यार्थिनींना शालोपयोगी भेटवस्तू प्रदान केल्या. त्यांच्या या अनोख्या भेटीने विद्यार्थिनी भारावून गेल्या. याबाबत वसतिगृहाच्या अधीक्षक सौ. सुप्रिया पवार परभणीकर यांनी आभार मानले. 
         समारोप प्रसंगी संजय पाडवी यांनी डॉ. विजया वाड यांची प्रसिद्ध स्त्रीवादी प्रतिज्ञा चे वाचन करून विद्यार्थिनींनी प्रतिज्ञा घेतली. यानंतर वंदे मातरम ने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. 
     
        याप्रसंगी वसतिगृहाच्या मदतनीस सौ. स्मिता जाधव , मुलांच्या वसतीगृहाचे गृहपाल श्री. अमोल निकम , श्री. कुणाल अनवट , छायाचित्रकार पिंटू राऊत यांनी छायाचित्रण सेवा देत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी कु. अश्विनी वाहुट हिने केले.

Post a Comment

0 Comments