सदगुरु रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड:- श्री नेमिनाथ जैन विद्यालयच्या एनसीसी चे विद्यार्थी प्रतीक्षा बोरगुडे व अविष्कार ठाकरे यांना मुख्यमंत्री शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
सात महाराष्ट्र बटालियन नाशिकचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल किरौला, प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल गौर, वरिष्ठ लिपिक सानप बाबूजी, धात्रक बाबूजी मंडलिक बाबूजी, भाग्येश धर्माधिकारी तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील, एनसीसी ऑफिसर राजेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रकमेचा धनादेश पालकांना सुपूर्द करण्यात आला.
विद्यालयाच्या या यशाबद्दल विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी विद्यार्थ्यांचे आणि विद्यालयाचे अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments