Type Here to Get Search Results !

मनसे सरचिटणीस दिनकर आण्णा पाटील यांची परिवर्तन कामगार सेना चांदवड कार्यालयास सदिच्छा भेट........ मनसे महिला जिल्हाध्यक्ष वैशालीताई सोनवणे यांनी केले स्वागत

सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः आज दिनांक २५ /३ /२०२५  रोजी मनसेचे सरचिटणीस श्री.दिनकर अण्णा पाटील यांनी परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य चांदवड येथील संपर्क कार्यालया स भेट दिली..त्या प्रसंगी संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून त्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले , त्यानंतर परिवर्तन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीमती वैशाली ते सोनवणे यांनी संघटनेच्या कामकाजाबद्दल माहिती दिली व परिवर्तन कामगार सेनेचे माध्यमातून सर्वसामान्य मजूर ,शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग बांधव, कामगार या सगळ्या पर्यंत शासनाच्या जनकल्याणाच्या योजना संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे कार्यकर्ते कशा पद्धतीने पोहोचवत आहेत हे सांगितले ,
अगदी कमी वेळेत परिवर्तन कामगार सेना ग्रामीण भागात अतिशय लोकप्रिय झालेली व मजुरांच्या कामगारांच्या हितासाठी काम करणारी प्रभावी संघटना आहे हे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
प्रसंगी उपस्थित परिवर्तन कामगार सेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती वैशालीताई सोनवणे, जिल्हा महासचिव माधव यशवंते, चांदवड तालुका अध्यक्ष अशोक कापडणे, मनमाड महिला शहराध्यक्ष शितलताई शेळके, जिल्हा उपाध्यक्ष देवाजी शेळके ,रावसाहेब गरुड जिल्हा संघटक तथा जिल्हा सहसंघटक रोहीनी ताई गागरे व अधिक कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments