Type Here to Get Search Results !

श्रीमती जे. आर. गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड येथे कर्मवीर ॲड .बाबुराव ठाकरे व यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी


सदगुरु रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
 चांदवड : श्रीमती जे. आर. गुंजाळ विद्यालय चांदवड येथे कर्मवीर र्ॲड.बाबुराव ठाकरे व  यशवंतराव चव्हाण जयंती अतिशय उत्साहाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संजय लोहकरे ,पर्यवेक्षक गरुड के के, गायकवाड के एन, स्वाती निकम  आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक समिती प्रमुख नितीन ठाकरे यांनी केले. विद्यालयाचे उपशिक्षक किरण गांगुर्डे यांनी कर्मवीर बाबुराव ठाकरे यांचे बालपण, वकिलीचा व्यवसाय, समाजकार्य, मविप्र संस्थेतील शैक्षणिक कार्य याविषयी सविस्तर माहिती आपल्या मनोगतातून दिली.नितिन ठाकरे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या सामाजिक कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजय लोहकरे यांनी कर्मवीर बाबुराव ठाकरे व यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यापासून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी व सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन केले.
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन ठाकरे व आभार सविता दिवटे  यांनी मानले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेत्तर बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments