Type Here to Get Search Results !

चांदवड प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनियमित वीज पुरवठा तसेच सौर पंपांच्या तक्रारीबाबत निवेदन



सदगुरू रक्षा न्युजः कैलास सोनवणे (दिघवद )
चांदवड - चांदवड तालुक्यातील अनियमित वीज पुरवठ्याच्या बाबत तसेच सौर पंपांच्या असंख्य तक्रारी  बाबत उपअभियंता सूर्यवंशी यांना चांदवड तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख गणेश रमेश निंबाळकर तालुकाप्रमुख प्रकाश चव्हाण व इतर कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
सध्या चांदवड तालुक्यातील शेतकरी अवेळी दिली जाणारी वीज,लोड शेडिंग आणि त्यातही अनियमित वीज पुरवठयाबाबत प्रचंड हैरान झालेले आहे. शेती पिकाला पाणी देणं अवघड होऊन बसलय. अशा या परिस्थितीत शेती करून दाखवा असे आव्हान प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विद्युत वितरण कंपनीला करण्यात आले तसेच सौर पंपांच्या बाबतीत सरकार एका बाजूला मागेल त्याला सौरपंप हे धोरण राबवतंय आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना सौर पंप मिळत नाही, आहे त्यांचा मेंटेनन्स वेळेवर केला जात नाही सौर कंपन्या शेतकऱ्यांची अनेक बाजूंनी पिळवणूक करताहेत त्याबाबतच्या असंख्य तक्रारीकडे सौर कंपन्या दुर्लक्ष करत आहे.तसेच विजेचा ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर खाजगी ठिकाणावरून भरून आणा, आठ दहा दिवस भेटणार अशी उत्तरे संबंधित कर्मचारी शेतकऱ्यांना देतात.अशा एक ना अनेक तक्रारी आहे आणि या विरोधात महावितरण कंपनीने वेळीच योग्य निर्णय न घेतल्यास प्रहार स्टाईलने तोडगा काढण्याचा इशारा प्रहार जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण व इतर सर्व प्रहार कार्यकर्त्यांनी महावितरण कंपनीला दिला.

Post a Comment

0 Comments