Type Here to Get Search Results !

साळसाणे येथे खंडेराव महाराज यात्रेला प्रारंभ


सदगुरू रक्षा न्युजः कैलास सोनवणे (दिघवद )
चांदवडः   साळसाणे ता  चांदवड येथे दिनांक8/2/ते 12/2/या कालावधीत खंडेराव यात्रेचे आयोजन करण्यात  आले आहे आज पहाटे घटस्थापना करण्यात येऊन आठ वाजता काठी ध्वजाची मिरवणूक होउन सायंकाळी पाच वाजता हळद लावणे आधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे   रोज रात्री वाघे मंडळ जागरण गोंधळचे आयोजित करण्यात आले आहे आज शाहिर  मधुकर जाधव व सोपान साठे सह पार्टी रविवारी रात्री सविता साळुंखे व अशोक सदगीर सह पार्टी सोमवार रात्री शिव मल्हार पार्टी टाकळी विंचूर मंगळवार मंदाबाई सोनवणे स पार्टी कोपरगाव बुधवार धोंडीराम जाबळे विजय सोनवणे भाग्यश्री परदेशी सह पार्टी चे जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले आहेत बुधवार संध्याकाळी मिरवणूक व कुलदीप शांताराम ठाकरे यांच्या हस्ते बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रम होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तर पहाटे रहाडी होम करण्यात येऊन लंगर तोडण्यात येईल या कार्यक्रमाला उमेश महाराज चव्हाण दरसवाडी नामदेव गांगुर्डे वाहेगाव साळ वाळुदादा गोलवड रायपुर जयराम बाबा वाघचौरे तळेगाव रोही दतुबाबाकाळे  बबनभाऊ अहिरे मनमाड राजु बाबा बरकले परसुल संपत काळे रेडगाव निवृती कहडणे अशोक शिंदे  आत्माराम आहेर भडाणेकर कचु बाबा ठाकरे दतु वाघे कैलास शेलार माधवकोकणे राजाराम भोसले  तशेंच जय मल्हार मंडळ  नाथ साम्राज्य ग्रुप शिव गर्जना ग्रुप नाथ बाबा दरबार परसुल चैतन्य कानिफनाथ मित्र मंडळ हिरापूर जय बाबाजी भक्त परिवार व साळसाणे ग्रामस्थ परिश्रम घेणार आहेत या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कुलदीप ठाकरे यांनी केले आहेत

Post a Comment

0 Comments