Type Here to Get Search Results !

चांदवड येथील एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयात “ वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमास प्रतिसाद.

सदगुरु रक्षा न्युजः चांदवड
चांदवड : येथील श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात “ वाचन संकल्प महाराष्ट्राचा ” हा अभिनव उपक्रम दिनांक १ जानेवारी ते १५  जानेवारी २०२५ या कालावधीत वाचन पंधरवाडा म्हणून ग्रंथालय विभाग, एनएसएस विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.

        या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन, आपल्या आवडीनुसार निवडलेल्या पुस्तकाचे सामुहिक वाचन करण्याचा सामुहिक उपक्रम, लेखक व विद्यार्थी यांच्यामधील वाचन संवाद कार्यक्रम, पुस्तक परिक्षण निबंध लेखन व पुस्तक कथन स्पर्धा आदी  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे  संचालक डॉ. आर. जी. तातेड यांनी दिली.

        याप्रसंगी डॉ. आर. जी. तातेड यांच्या हस्ते  ग्रंथ प्रदर्शनाचे  उदघाटन करण्यात आले. तसेच डॉ. आर. जी. तातेड यांनी उपस्थितांना नमूद केले की,  वाचकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व वाचन संस्कृतीला चालना मिळावी यासाठी अवांतर वाचन खूप महत्वाचे आहे हे विविध उदाहरण देऊन स्पष्ट केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने  विद्यार्थी,  सर्व विभागप्रमुख, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

          सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे संचालक डॉ. आर. जी. तातेड व उपसंचालक डॉ. एम. आर. संघवी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल डॉ. एम. बी. केदार , एनएसएस अधिकारी प्रा. डी.आर. अग्रवाल , विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. एस. एस. ठाकरे , ग्रंथालय सहाय्यक एस. एस. पवार, वाय. आर. शेळके, एस. व्ही. गुजराथी यांनी केले आहे.

          सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक  झुंबरलाल भंडारी, विश्वस्त समिती सदस्य व महाविद्यालयाचे समन्वयक सुनीलकुमार चोपडा, योगेश मोदी, अभिजित मोदी आदीसह सर्व  विश्वस्त मंडळ व सर्व  प्रबंध समितीचे सदस्य आदीनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments