Type Here to Get Search Results !

१५ जानेवारी रोजी चंद्रेश्वरबाबा संयुक्त पुण्यतिथी संपन्न...

सदगुरु रक्षा न्युज : कैलास सोनवणे (दिघवद ) 
चांदवड :  येथील श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे सालाबाद प्रमाणे... महंत गंगापुरीजी , महंत प्रभातपुरीजी व तृतीय चंद्रेश्वरबाबा महंत स्वामी बन्सीपूरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व  स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री चंद्रेश्वरबाबा संयुक्त पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला यावेळी प. पु. स्वामी दयानंदजी(प्रथम चंद्रेश्वरबाबा) व प.पु. महामंडलेश्वर स्वामी विद्यानंदजी  (द्वितीय चंद्रेश्वरबाबा)यांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला मंगळवार दिनांक १४ जानेवारी रोजी रात्री - ०९ ते ११ वा. ह.भ.प.प्रभाकर नाना झोलकर , परभणीकर यांचे जाहिर किर्तन झाले. व श्री चंद्रेश्वर महादेव भगवान चां अभिषेक करण्यात आला. श्री चंद्रेश्वरबाबांच्या दोन्ही समाधींचे पुजन झाले त्यानंतर श्री चंद्रेश्वरबाबांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे  काढण्यात आली व श्री सप्तॠषी समाधी पुजन करण्यात आले. सकाळी - ११ वा. महाप्रसाद व भंडारा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात स्वामी नागराजपुरीजी ,स्वामी गणेशानंदजी,मंगरूळ गुरूद्वारा चे महंत बाबा कमलजितसिंग पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळे व आदी संत महंत यांनी उपस्थिती नोंदवली. असंख्य भाविक-भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराचे सदस्यांनी सेवा कार्य केले.

Post a Comment

0 Comments