सदगुरू रक्षा न्युज चांदवड
चांदवड - शासकीय रेखाकला परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीत वाढीव गुणांचा फायदा होतो तसेच तंत्रशिक्षण व कला, उच्चकला अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत या परीक्षा विचारात घेतल्या जातात. कलाशिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला एलिमेंटरी ग्रेड चित्रकला परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून या परीक्षेत श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयाने यश संपादन केले अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या या एलिमेंटरी परीक्षेत विद्यालयातील १२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विद्यालयाचा ९९.१८ टक्के निकाल जाहीर झाला असून परीक्षेत अ श्रेणीत आराध्या गांगुर्डे, आरती शिंदे, आर्या येवला, अर्णव जाधव, भक्ती ओझा, दिव्या सूर्यवंशी, गौरव ठाकरे, गायत्री बेलदार, जानवी देवरे, कादंबरी बेलदार ,ललित ठाकरे, लावण्या चव्हाण, मधुरा गुजराथी, परमेश्वरी शेळके, पायल दळवी, पूजा रकिबे, रुद्र आहेर, रुद्र डाके, ऋषिकेश ठाकरे, साईराज रोकडे, सारा तांबोळी, सेजल कोकणे, शरयु गायकवाड, शितल पगार, श्रद्धा राजगिरे, श्रेया वाघ, सोनाली बोरसे, सुयोग देवरे, स्वरा क्षत्रिय, वैभवी गांगुर्डे, वैष्णवी ठाकरे, वैष्णवी कोतवाल, विजय निषाद या विद्यार्थ्यांनी तर ब श्रेणीत सदोतीस विद्यार्थ्यांनी आणि उर्वरित एक्कावन्न विद्यार्थ्यांनी क श्रेणीत यश संपादित केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक काशिनाथ अहिरे यांनी मार्गदर्शन केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी कौतुक केले.
विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे उपमुख्याध्यापक देवेंद्रराजे पर्यवेक्षक रामचंद्र पाटील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर सहकारी यांनी कौतुक केले.
Post a Comment
0 Comments