Type Here to Get Search Results !

चांदवड शहरात मोकाट कुत्र्यांचा धुडगूस................. गत वर्षात 465 श्वानदंश; निर्बीजीकरणाच्या उपायाची मागणी तीव्र.....

सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड : शहरामध्ये नगरपरिषदेला कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने देण्यात आले. चांदवड शहरांमध्ये नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. या कुत्र्यांमुळे विद्यार्थ्यांना व लोकांना रस्त्यावर कसे चालायचे ?, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. शाळेत जाताना विद्यार्थ्यांना त्यांचा जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. कुत्र्यांमुळे विद्यार्थी व लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात कुत्रे अनेकांना चावा घेत आहे. अशा अनेक दुर्दैवी घटना घडत आहे. नगरपरिषद अधिकारी कुत्र्यांच्या बंदोबस्ताचे टेंडर काढत निधी लाटत आहेत. दिलेल्या निवेदनावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. अन्यथा नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ), नाशिक जिल्हा  उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे देण्यात आलेला आहे.    
चांदवड नगरपरिषदेच्या गेट समोर कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट.

Post a Comment

0 Comments