चांदवड (प्रतिनिधी) दिनांक ३० जानेवारी २०२५
श्रीमती जे. आर. गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड येथे महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री संजय लोहकरे सर होते. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य लोहकरे सर , पर्यवेक्षक गरुड सर,सर्व शिक्षक बंधू -भगिनी यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री सोनवणे एस .आर. यांनी महात्मा गांधी यांनी देशासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री.लोहकरे सर यांनी सत्य अहिंसेचा मंत्र देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाजकार्याची व कठोर परिश्रम आणि त्यागमय जीवनाची महती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ठाकरे एन.के यांनी केले तर आभार श्री गांगुर्डे के.पी.यांनी मानले.
कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments