Type Here to Get Search Results !

दिघवद व मौजे उर्धुळ गावच्या सरपंचांनी घेतली खासदार भास्करराव भगरे विविध कामांसाठी भेट ‌‌


सदगुरू रक्षा न्युजः कैलास सोनवणे ( दिघवद )
चांदवडः दिघवद सरपंच रावसाहेब गांगुर्डे व उर्धुळ गावच्या सरपंच सौ कविताबाई ठाकरे यांचे पती श्रीहरी ठाकरे यांनी दिंडोरी मतदार संघाचे खासदार भास्करराव भगरे यांची त्यांच्या निवासस्थानी कार्यालयात भेट घेऊन दिघवद गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी शेड करणे तसेच पेवर ब्लॉक बसवणे व कॉंक्रिटीकरण करणे गावातील शेड करणेबाबत व सोयाबीन विक्रीवर प्रतिक्विंटल 1500 रुपये अनुदान मिळणे रासायनिक खतांची सबसिडी मिळावी व खतांचे दर कमी करणे  कांदा व द्राक्षे यांना निर्यात शुल्क 0 टक्के करणे तसेच येवला गुजरात महामार्ग क्रमांक 25 हा दिघवद गावातुन न घेता गावाच्या बाहेरून घेण्यात यावा घरकुलाची मंजुरी करून लवकरात लवकर अदा करणे असे दिघवदचे सरपंच रावसाहेब गांगुर्डे यांनी  निवेदन दिले तर मौजे उर्धुळ हनुमान मंदिर परिसर व चौकात पेव्हर ब्लॉक बसवणे व कॉंक्रिटीकरण, सुशोभिकरण करणे त्याचप्रमाणे चांदवड तालुक्याचा मालेगाव जिल्हामध्ये समावेश करू नये चांदवड तालुका नाशिक जिल्ह्यात ठेवावा तशेंच चांदवड तालुक्यातील काही गावे दत्तक घेण्याचा विनंती केली व जलजीवण योजना लवकरात लवकर चालू करावी व सदरची कामे लवकरात लवकर मंजुर करून मतदार संघात उदघाटनासाठी येण्याची विनंती सरपंच रावसाहेब गांगुर्डे श्रीहरी ठाकरे व प्रताप गांगुर्डे यांनी केली व निवेदन देण्यात आले यावेळी खासदार भास्करराव भगरे यांनी चांदवड तालुका हा जिल्हा निर्मिती होईल तेव्हा नासिक जिल्हयातच राहील याचा पाठपुरावा करू असे सांगितले.

Post a Comment

0 Comments