Type Here to Get Search Results !

श्री नेमिनाथ जैन विद्यालयात प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण.....

सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड:- श्री नेमिनाथ जैन विद्यालयात 76 वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयातील एनसीसी विभाग प्रमुख राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या एनसीसी कॅडेड ने स्वागत संचालनाने प्रमुख अतिथींचे आगमन झाले.
विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षिका दुर्गा शाकद्विपी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारा विद्यालयाचा माजी विद्यार्थी मयुर गांगुर्डे देखील उपस्थित होते.
यानंतर विद्यालयातील संगीत विभाग प्रमुख संगीता चव्हाण व त्यांच्या चमूने राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वज गीत सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपशिक्षक ज्ञानेश्वर खांदोडे यांनी केले.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर सहकारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments