Type Here to Get Search Results !

नेमिनाथ जैन विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न.....


सदगुरु रक्षा न्यूज : कैलास सोनवणे (दिघवद )
चांदवड:- श्री नेमिनाथ जैन विद्यालयात माध्यमिक शालांत परीक्षेत प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षेची शपथ देत शुभेच्छा समारंभ संपन्न झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
 दि.25 जानेवारी 2025 रोजी नेमिनाथ जैन विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांच्या  अध्यक्षतेखाली दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात प्रथमता विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे,उपप्राचार्य देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील व दहावीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन  करण्यात आले. त्यानंतर सर्व शिक्षक,शिक्षिका आणि शिक्षकेतर सहकाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात वेळेचे नियोजन व अभ्यास पद्धती याविषयी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
येणारी परीक्षा कॉपीमुक्त व्हावी या अनुषंगाने विद्यालयाचे उपशिक्षक  अमोल पवार यांनी कॉपीमुक्त अभियानाची शपथ विद्यार्थ्यांना दिली.
विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांविषयी ऋण व्यक्त केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु यश गायकवाड याने केले. तर सूत्रसंचलन कु दीक्षा निकम या विद्यार्थिनीनी केले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी शुभेच्छा दिल्या. 
कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांसह इयत्ता दहावीचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments