चांदवड : केंद्र सरकारने कांदा निर्यात मूल्य कमी केल्याबद्दल आज राहुड ता.चांदवड येथे आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या उपस्थितीत शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालूका अध्यक्ष रघुनाथ आहेर, कृ.उ.बा.समीती संचालक श्री. पंढरीनाथ खताळ व कृ.उ.बा.समीती संचालक श्री.योगेश ढोमसे यांनी आपले मत व्यक्त करून केंद्र शासनाचे आभार मानले
याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, मा.सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री.शांताराम भवर, डॉ.भावराव देवरे, श्री.वाल्मिक पवार, श्री.बापू सोमवंशी, श्री.पिंटू भोयटे, श्री.अमर मापारी, श्री.अमोल देवरे, श्री.राहुल हंडगे तसेच यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments