Type Here to Get Search Results !

वरदडी येथील शनैश्वर देवस्थानच्या भक्तनिवासाचे आमदार डॉ राहुलदादा आहेर यांचेहस्ते लोकार्पण

सदगुरू रक्षा न्युज : कैलास सोनवणे ( दिघवद )
चांदवडा : चांदवड तालुक्यातील अतिप्राचीन वरदडी येयील शनीमंदीर या ठिकाणी चांदवड तालुक्याचे आमदार डॉ राहुल दादा आहेर यांच्या विशेष प्रयत्नातुन दीड कोटी रुपयांचा निधी या मंदिरास भक्ती निवासासाठी मिळाला होता त्यात या ठिकाणी भक्तनिवास बांधुन पुर्ण झाल्याने या भक्त निवासाचा लोकार्पण सोहळा आज पंचकोषीतील नागरीकांच्या व शनैश्वर भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला
शनैश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले यावेळी ट्रस्टचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मेजर वाल्मीक पवार यांनी केले
  यावेळी पंढरीनाथ खताळ, रघुनाथ आहेर , योगेश ढोमसे, भाजप तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, अशोकदादा गायकवाड मा.सभापती डॉ.नितीन गांगुर्डे,  युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शांताराम भवर, डॉ.भावराव देवरे, वाल्मिक पवार, बापू सोमवंशी, पिंटू भोयटे, कैलास गुंजाळ , अमर मापारी,अमोल देवरे, राहुल हांडगे , महेश खंदारे, बाळा पाडवी , विशाल ललवाणी व राहुड, उसवाड, चिंचवे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments