Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष वैशालीताई सोनवणे यांनी विद्यार्थीनींसाठी केली शाळा व ग्रामपंचायत कडे सीसीटीव्ही ची मागणी

सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडा / दुगांवः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माननीय राज साहेब ठाकरे अमित साहेब ठाकरे शालिनीताई ठाकरे यांच्या आदेशाने व सुजाता ताई डेरे प्रदेश उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शना खाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष महिला सेना वैशालीताई सोनवणे यांच्या निवासस्थानी दुगाव येथे त्यांच्या घरी सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ताईंच्या घरी गणपती बाप्पाची आरती केली तसेच महिलांवर वारंवार झालेल्या अन्याया बाबत दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चांदवड तालुक्यातील दुगाव येथे प्राथमिक शाळा दुगाव व उच्च माध्यमिक शाळा दुगाव तसेच दुगाव ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच व शाळेतील मुख्याध्यापकांना निवेदन देण्यात आले शाळेतल्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी तसेच गावातल्या महिलांच्या संरक्षणासाठी व गावाच्या संरक्षणासाठी गावात सीसीटीव्ही कॅमेरे व एक गुरखा गावाला देण्यात यावा अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी दुगाव ग्रामपंचायतीकडे मागणी केली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्ष वैशालीताई सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णताई सांगळे चांदवड तालुकाध्यक्ष भाग्यश्रीताई केदारे तालुका उपाध्यक्ष छायाताई बिडवे नांदगाव तालुका अध्यक्ष रोहिणीताई घागरे मनमाड शहर अध्यक्ष शितलताई शेळके उपशहर अध्यक्ष शितल संतोष शेळके सरलाताई संसारे मनमाड शहर उपाध्यक्ष देवा भाऊ शेळके नांदगाव तालुका संघटक रावसाहेब भाऊ गरुड राहुल भाऊ पांडे दुगाव गावातील पोलीस पाटील महिला सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments