Type Here to Get Search Results !

चांदवड आय टीआय मध्ये मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण भव्य रोजगार मेळावा संपन्न ............ रोजगार मेळाव्यात 51 उमेदवारांना निवड पत्र वाटप

सदगुरु रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड :शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवार दिनांक 25/9/2024 रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण भव्य रोजगार मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निवासी नायब तहसीलदार विजय कचवे एस.एन.जे.बी. पॉलिटेक्निक कॉलेजचे अल्केश अजमेरा,महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक आशिष झिरपे,ॲक्सिस बँकेचे गणेश ताजने,अक्षय राऊत, एम एस एस इंडिया चे राजेंद्र आचारी,सागर बेडीसकर,तालुका कृषी अधिकारी खैरनार व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संदीप भदाणे आदी मान्यवर  व्यासपीठावर उपस्थित होते. 
यावेळी निवासी नायब तहसीलदार विजय कचवे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रोजगार मेळावा या संबंधित उमेदवारांनी कशाप्रकारे नोंदणी करायची तसेच या योजनेतून उमेदवारांना नोकरीची संधी व पुढील आयुष्यातील नोकरीच्या संधींची खुली होणारे दारे याबद्दल उमेदवारांना मार्गदर्शन केले. तर एम.एस.एस.आय.इंडिया चे राजेंद्र आचारी यांनी आपल्या आस्थापनेत वेगवेगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना व उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देऊ याची ग्वाही दिली व त्या संबंधित एकूण 25 उमेदवारांना निवड प्रमाणपत्र दिले यावेळी निवासी नायब तहसीलदार कचवे यांच्या हस्ते तहसील कार्यालयातील  39 निवड प्राप्त उमेदवारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या रोजगार मेळाव्यात एकूण 51 उमेदवारांना निवडीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. 
अध्यक्षीय भाषणात संस्थेचे प्राचार्य संदीप भदाणे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मानधनाबद्दल तसेच नोकरीची सुवर्णसंधी असल्याबद्दल माहिती दिली व महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या या रोजगार मेळाव्या संदर्भातील मार्गदर्शन केले. तर अतिशय सुंदर पद्धतीने भव्य दिव्य अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल सर्व संस्थेतील कर्मचाऱ्यांचे आभार मानले व या योजनेत  जास्तीत जास्त संख्येने उमेदवारांनी  लाभ घ्यावा व नोंदणी करावी या संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सूत्रसंचालन संस्थेचे शिल्पनिदेशक विनोद पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे शिल्पनिदेशक मधुर महेश गुजराथी यांनी केले प्रास्ताविकात योजने संबंधित संपूर्ण माहिती अटी व शर्ती या संदर्भात माहिती देण्यात आली कार्यक्रमाचे आभार शिल्पनिदेशिका  अंकिता क्षिरसागर यांनी मानले. यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक श्रीरत्न बरडे, शिल्पनिदेशक विजय संवत्सरकर, सोनाली भंडारी,टी.एम.भोई,एस. एल. गांभिरे,एस.एम.साबळे पी.व्ही.पाटील,एस.आर.सूर्यवंशी,आर.टी.उगले,एस. पी. माळोदे,सुशील जाधव,अमोल राऊत,आकाश व्यवहारे ,भूषण ठाकरे, श्रीमती जुलेखा पठाण,आदींसह संस्थेतील सर्व शिल्पनिदेशक,निदेशिका कर्मचारी व असंख्य उमेदवार या रोजगार मेळाव्यास उपस्थित होत.
[चांदवड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण भव्य रोजगार मेळाव्यास मार्गदर्शन करताना निवासी नायब तहसीलदार विजय कचवे अल्केश अजमेरा,महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक आशिष झिरपे,ॲक्सिस बँकेचे गणेश ताजने,अक्षय राऊत, एम एस एस इंडिया चे राजेंद्र आचारी,सागर बेडीसकर,तालुका कृषी अधिकारी खैरनार व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संदीप भदाणे आदी तर दुसऱ्या छायाचित्रात मेळाव्यास उपस्थित उमेदवार. ]

Post a Comment

0 Comments