चांदवड : देशाची एकता आणि एकात्मता धोक्यात आणणाऱ्या आणि धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण करणाऱ्या आरोपींवर कारवाई करणेबाबत चांदवड तालुका सकल हिंदु समाजाच्या वतीने चांदवड पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरिक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आले
महाराष्ट्र शासनाकडून औरंगाबादचे जिल्ह्याचे नामकरण हे "छत्रपती संभाजीनगर" असे करण्यात
आले आहे. ही वस्तुस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात सर्वज्ञात आहे. छत्रपती संभाजी महाराज हे राष्ट्रीय अस्मितेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा भाग आहेत. संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला पूजनीय असणारे छत्रपती संभाजी महाराज हे हिंदूंचे आराध्य दैवत आहे. हिंदूंना देवतुल्य असणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्रात ठरवुन झालेला अपमान हिंदू समाजाला भडकवणारा आणि हिंदू समाजाला संताप आणून देणारा आहे.
दिनांक 23/09/2024 रोजी AIMIM या राजकीय पक्षाने इम्तियाज जलील या माजी रवासदार नेत्याच्या नेतृत्वाखाली " तिरंगा रैली " अशी नावाची एक रॅली निघाली होती. सदरील तिरंगा रॅलीमध्ये " इम्तियाज जतीत या नेत्याने आणि त्याच्या नेतृत्वाखाली असलेल्या या रॅलीमध्ये समाविष्ट असणाऱ्या इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या जमावाने छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी आणि अपमान जाणीवपूर्वक केला आहे. इम्तीयाज जलील यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण रॅली होती आणि इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरूनच रॅलीमधील जमावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या "छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरीत" नामनिर्देशित फलकावरील छत्रपती संभाजीनगर या नावाला काळे फासून विद्रुपीकरण करण्यात आहे. सदरील रॅलीमध्ये छत्रपती संभाजीनगर नगर मार्गावरील गोळवाडी फाटा तसेव छत्रपती संभाजीनगर , जालना महामार्गावरील समृद्धी बायपास, देवळवाडी फाटा, महिको कंपनी, शेलगाव ब्रिज, मात्रेवाडी या आणि इतर सर्व ठिकाणच्या फलकांना काळे फासून विद्रूप
सदरील घटना हि जाणीवपूर्वक देशभरातील आणि महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा धोक्यात आणून दोन समाजामध्ये तणाव निर्माण करण्याच्या हेतूने करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आणि हिंदूंचे आराध्य दैवत असणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा हा केलेला अपमान महाराष्ट्रातील राष्ट्रभक्त समाजाला मनाला सहन न होणारी आहे. यासोबतच या रॅली मध्ये असणाऱ्या एकाही चारचाकी वाहनाने महामार्गावरील टोल भरला नाही. हि घटना दिसायला जरी छोटी असली तरी यातून महाराष्ट्रातील आणि देशातील प्रत्येक त्या नागरिकाचे नुकसान झाले आहे, जो प्रामाणिकपणे कर टोल भरतो. या घटनेतून इम्तियाज जतील आणि त्यांच्या AIMIM या राजकीय पक्षाला असे दाखवायचे आहे कि, " आम्ही या महाराष्ट्रात आणि देशात काहीही करणार... कसेही वागणार..." कारण नियालेली रॅली ही पूर्णपणे इम्तियाज जलील आणि त्या AIMIM या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली निघाली होती. इम्तियाज जलील ही व्यक्ती कोणी अज्ञानी नसून खासदार राहिलेले व्यक्तिमत्व आहे. इम्तियाज जतीत यांना
छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करताना चांगले ठाऊक होते कि, या घटनेन हिंदू समज आणि प्रत्येक राष्ट्रभक्त माणूस दुखावला जाणार आहे. या सर्वांची पूर्वकल्पना असून देखील त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली झालेली छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी आणि अवमान हि कायदेशीर कारवाईस पात्र आहे. इम्तियाज जलील यांनी "हिंदू समाजाला भडकवण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता व सार्वभौमत्व धोक्यांत आणून देशात हिंदूंचे स्थान दुय्यम आहे" हे दाखवण्यासाठी सदरील कृत्य जाणीवपूर्वक केले आहे.
सदरील झालेल्या घटनेमुळे समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आहे. सदरील प्रकार हां दोन धार्मिक समूहांमध्ये जाणीवपूर्वक द्वेष आणि तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने इम्तियाज जलील आणि त्याच्या AIMIM या राजकीय पक्षाने केला आहे. सदरील घटनेत जाणीवपूर्वक सार्वजनिक मालमतेस नुकसान इम्तियाज जलील आणि त्याच्या AIMIM या राजकीय पक्षाने केले आहे. इम्तियाज जलील आणि त्याच्या AIMIM या राजकीय पक्षाचे अश्या प्रकारचे वर्तन हे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून समाजात अशांतता निर्माण करणारे आहे.
वरील सर्व घटना आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेता यामध्ये दोषी आणि आरोपी असलेले "इम्तियाज जलील आणि त्याच्या AIMIM या राजकीय पक्षाचे प्रामुख्याने असणारे पक्षप्रमुख तसेच AIMIM या राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि यात सहभागी असलेले इतर AIMIM चे कार्यकर्ते, या घटनेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधित असलेले रॅली मधील आरोपी" यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.
निवेदन देण्यासाठी चांदवड पोलीस स्टेशन येथे जितु कोतवाल आकाश सानप सचिन जगताप प्रकाश परदेशी शुभम दिवटे.सागर गाडे प्रसाद प्रजापत
गौरव मते राहुल ढगे संतोष पवार
चेतन शेलार व सकल हिदु समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Post a Comment
0 Comments