सदगुरु रक्षा न्युज: सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड: सत्ताधार्यांना सळो की पळो करून सोडणारे शिवसेनेची बुलंदतोफ शिवसेना नेते माननिय खासदार संजय राऊत साहेब यांचे आज चांदवड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी शिवसेना शहरप्रमुख प्रसाद प्रजापत यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.चांदवड देवळा मतदार संघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटावा अशी मागणी शिवसेना शहर संघटक सचिन (गुड्डू) खैरनार यांनी खासदार राऊत साहेब यांच्याकडे केली यावेळी माजी नगरसेवक श्री राजकुमार संकलेचा, सागर बर्वे, शंभुराजे खैरे, धीरज संकलेचा ,तालुका संघटक केशवनाना ठाकरे, ज्ञानेश्वर आवारे, वाहतूक सेना अध्यक्ष अकबरभाई पठाण, तोफिकभाई शेख, मनोज जाधव, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष घमाजीराजे सोनवणे, युवासेना उप-शहरप्रमुख रुपेश बागुल, सौरव देशमाने, सचिन अग्रवाल, सचिन देशमाने, अंबादास आहेर, मयुर सोनवणे, भुषण खैरे, सचिन शिंदे, अविनाश खैरे कार्यालय प्रमुख विष्णूकाका कोतवाल आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments