चांदवड : येथील शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृहात आज *०९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिन* उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी वसतिगृहाचे गृहपाल श्री. अमोल निकम व गृहपाल सौ. स्वप्नाली पाटील यांनी प्रास्ताविक केले. दीपप्रज्वलन व आदिवासी क्रांतिकारकांना अभिवादन करत कार्यक्रमाला सुरुवात केली. व आदिवासी विद्यार्थ्यांनी सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत वैभव जाधव , दिनकर लव्हारे , दुर्गा कातडे , सुनिता सुर्यवंशी , कल्याणी कोशारे यांनी आदिवासी दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्यात अर्चना महाले , ज्ञानेश्वरी चौरे , जागृती चौरे , वर्षा महाले , कल्याणी कोशारे यांनी आदिवासी नृत्य सादर केले.
*" आदिवासींची लोकसंस्कृती व आधुनिक तंत्रज्ञान काळातील विकास वाटा... "* या विषयावर प्रा. डॉ. सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच भाजपा आदिवासी मोर्चा चे तालुकाध्यक्ष संजय पाडवी यांनी आदिवासी लोकजीवन या विषयावर व आदिवासी कविता सादर करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रा. उदय वायकोळे व प्रा. योगेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या सोहळ्यात प्रा. अहिरराव , सामाजिक कार्यकर्ते बंडु पवार , अनिल पवार , कार्यालयीन लिपिक जे. आर. उबाळे , अनिल कांबळे , एस. एन. बावा , संदीप शेवाळे , श्रीमती जाधव आदी कर्मचारी वृंद व वसतिगृहातील असंख्य विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी झाले.
Post a Comment
0 Comments