दिघवद : जिद्द चिकाटी मेहनत आणि आपल्या ध्येयप्रती आपण प्रामाणिक असाल तर कोणतीही गोष्ट आपल्याला मिळू शकते. याचा प्रत्यय दिघवद ता.चांदवड येथील शेतकरी कन्या वृषाली रमेश गांगुर्डे हिने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढे ठेवला आहे. तिची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उत्तीर्ण परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक या पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल गावकऱ्यांनी दिघवद या गावी मिरवणूक काढून निमगव्हाण येथील समर्थ लॉन्स या ठिकाणी भव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता.
वृषाली पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचली जरी असली तरी तिचा इथपर्यंतचा प्रवास रंजक आणि संघर्षमय राहिला आहे. वृषालीचे आई वडील हे शेतकरी कुटुंब असल्याने परिस्थिती तशी सर्वसाधारणच. मात्र या परिस्थितीचा कोणताही बाऊ न करता वृषालीने हे सर्व न्युनगंड बाजूला ठेवत परिस्थितीशी दोन हात केले.दिघवद या गावातच प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षण पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण लासलगाव येथील महाविद्यालयात पूर्ण केल्यानंतर 2018 मध्ये वृषालींनी मेहनतीच्या जोरावर सीआरपीएफ मध्ये यश मिळविले. परंतु उपजतच संघर्ष करण्याची सवय असेल तर ती जिद्द माणसाला स्वस्त बसू देत नाही. म्हणूनच की काय वुषालीने 2019 मध्ये जळगाव येथे पोलिसाची नोकरी मिळविली .परंतु तिचा प्रवास अजून थांबला नव्हता. 2019 मध्ये पुन्हा ती मंत्रालयात क्लर्क या पदावर परीक्षा उत्तीर्ण होऊन रुजू झाली. या पदावर रुजू असतानाच वुषालीचे ध्येय अजून संपलेच नव्हते असे म्हणावे लागेल. कारण नोकरीच्या या तिसऱ्या प्रयत्नातील पदावर असतानाही वृषालीने पुन्हा एमपीएससी परीक्षेची तयारी चालू केली. आणि नुकत्याच झालेल्या परीक्षेत तिने पी एस आय पदाला अखेर गवसणी घातली. वृषालीचा हा प्रवास पाहता वृषालीच्या बाबतीत ती शेतकरी कन्या नव्हे, तर संघर्ष कन्या आहे. असेच म्हणावे लागेल.
निमगव्हाण येथील समर्थ लॉन्स मध्ये वृषालीचा यानिमित्ताने भव्य सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल होते. यावेळी व्यासपीठावर कुऊबा माजी सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे मविप्र संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड,कुऊबा सभापती संजय जाधव, उबाठा शिवसेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन आहेर, शिवाजी कासव गणेश निंबाळकर पोपटराव गांगुर्डे नायब तहसीलदार खेडकर साहेब नवनियुक्त पीएसआय धनंजय न्याहरकर डॉ. श्याम जाधव समाधान जामदार अशोक गांगुर्डे पिंटू भोईटे बोरगुडे काका वुषालीचे गुरुवर्य दत्तात्रय आरातनूर पाटील यांचेसह विक्रम जगताप घनश्याम गांगुर्डे सुदर्शन गांगुर्डे श्याम गांगुर्डे सोपान गांगुर्डे राम बोरसे टीएम पेंढरी एस डी गांगुर्डे सर्कल काळे प्रभाकर गांगुर्डे रघुनाथ गांगुर्डे सोपान गांगुर्डे गणेश गांगुर्डे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शांताराम हांडगे यांनी तर आभार अर्जुन गांगुर्डे यांनी मानले.
Post a Comment
0 Comments