चांदवड : तालुक्यातील हरवलेल्या दोन्ही मुली अखेर समाज माध्यमांवर व्हायरल केलेल्या फोटोमुळे सापडल्या असुन समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल विविध तर्क लावले जातात काही चांगल्या तर काही वाईट असतात परंतु
सदरच्या मुली कॉलेज युवती काजल पवार व सिद्धी बोटवे यांच्या सतर्कतेमुळे सोशल मिडीयावर फोटो बघितला असल्याने त्यांना त्या दोघींना ओळखण्यास अडचणच आली नाही
यावेळी या दोनीही कॉलेजच्या युवती मालेगांव येथे कॉलेजला जाण्यासाठी बसमध्ये आल्या असता शेवटच्या सीटवर बसलेल्या या छोट्या मुलींकडे नजर जाताच त्यांनी त्या लहान मुलींना ओळखलं त्याचक्षणी कॉलेज युवतींनी तत्काळ खाली उभ्या असलेल्या व्यक्तीना याबद्दल सांगितल्याने मोठा अनर्थ टळल्याची घटना यामुळे घडली आहे. 
चांदवड तालुक्यातील बेपत्ता अल्पवयीन मुलींना शोधून देणा-या चांदवड च्या कर्तव्यदक्ष कन्या... कुमारी काजल संदीप पवार आणि कुमारी सिद्धी ईश्वर बोटवे यांच्या आदर्शवत कार्याचा सन्मान करण्यासाठी व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यासाठी स्वा. सावरकर युवा विकास मंच चांदवड.परिवारातर्फे सन्मान सोहळा... आयोजित करण्यात आला होता. 
दोन्हीही कंन्यांना ज्येष्ठांनी शुभाशीर्वाद दिले व मंच चे आधारस्तंभ संतोष शेठ पलोड व सुनिल कबाडे यांनी सन्मानचिन्ह , शाल श्रीफळ व भेट वस्तू प्रदान करण्यात आले. यावेळी मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले. या मुलींच्या कार्याचा परिसरातील सर्व नागरिकांतर्फे गौरव करण्यात येत आहे.
याप्रसंगी मनोज बिरारी यांनी सन्मानपत्राचे वाचन केले, सुनिल कबाडे यांनी उपस्थित बांधवांना संबोधित केले. बाळा पाडवी यांनी कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचलन केले. 
दरम्यान शहरातील प्रसिद्ध के मार्ट मॉल चे संचालक प्रभाकर शेठ क्षत्रिय व किशोर क्षत्रिय यांनी देखील भेट वस्तू देत या कर्तव्यदक्ष कन्यांचा सन्मान केला.
या सन्मान सोहळ्यात चांदवड शहरातील असंख्य नागरिकांनी उपस्थिती नोंदवली.
Post a Comment
0 Comments