Type Here to Get Search Results !

रापली येथील बेपत्ता झालेल्या पाच वर्षाच्या लहान मुलाचा विहीरीत सापडला मृतदेह ....परिसर हळहळला

सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड : चांदवड तालुक्यातील मनमाड लगतच असलेले मौजे रापली येथून कृष्णा ज्ञानेश्वर बिडगर (वय ५ वर्ष ) रविवारी दुपारी बारा वाजेपासून बेपत्ता होता सदर घटनेची दखल घेऊन काल रात्री 6 वाजे पासून पोलीस प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न केले व रात्री गावातच मनमाडचे डी .वाय .एस .पी श्री बाजीराव महाजन व चांदवडचे पी.आय. कैलास वाघ यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह मुक्काम ठोकून रात्रभर तपास कार्य चालू ठेवले गावातील तरुण मुलांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला गावातील बऱ्याच विहिरीचे पाणी काढून बघण्यात आले आज सकाळी घटनेचे गाभिर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीणचे एस पी विक्रम देशमाने साहेब व मालेगाव ॲडिशनल एस पी अनिकेत भारती, मनमाड
 डी वाय एस पी बाजीराव महाजन चांदवड पी आय कैलास वाघ, मनमाड पीआय खरे 
 येवला पोलीस स्टेशन यांनी परिसराची कसून तपासणी केली. यावेळी परीसरातील भागवत झाल्टे, संघरत्न संसारे व गावातील युवा तरुण मित्रांनी मोठ्या प्रमाणात परिसरात शोध घेतला. रात्रभर हे सर्व तपास कार्य सुरुच होते शेवटी आज गावाकऱ्यांनीही शर्थीचे प्रयत्न केले अनेक तर्क वितर्क  यावेळी काढण्यात आले कुणी ह्या मुलाचे अपहरण केले की काय या संदर्भात परिसरातील अनेक CCTV तपासण्यात आले शेजारीच रेल्वे लाईन असल्याने सर्व बाजूने तपास करून शोध न लागल्याने सदर घटनेची दखल घेत काल सायंकाळी ६:०० वाजे पासून  पोलीस प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न सुरु केले सदरील शोध महिमेत डॉग स्कोड ची मदत घेतली गेली असता घरासमोरच्या विहिरीकडे ह्या डॉग स्कॉड ने मार्ग दाखविल्याने सौंशय बालवला आणी सदिरलं विहिरीत शोध घेतला सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सुभाष बिडगर यांच्या स्वतःच्याच दहा परस विहीरीत त्यांच्याच नातु कृष्णा याचा मृतदेह मिळून आला. दहा परस विहीरीत भागवत झाल्टे यांनी उतरून सदरचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.

Post a Comment

0 Comments