Type Here to Get Search Results !

श्री नेमिनाथ जैन प्राथमिक शाळेमध्ये पालक शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न

सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
दि.10 ऑगस्ट 2024- चांदवड येथे श्री नेमिनाथ जैन प्राथमिक शाळेमध्ये पालक शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री नेमिनाथ  जैन संस्थेचे नवनिर्वाचित प्रबंध समितीचे सदस्य श्री महेंद्र भाऊ पारख हे उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समिती तसेच सर्व समित्यांचे सदस्य उपस्थित होते. इयत्ता पहिली ते चौथीचे सर्व पालक पालक मेळाव्यासाठी हजर होते.
 शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदीप ललवाणी  सर यांनी प्रोसिडिंग वाचन केले. श्रीमती सारिका पगार व श्रीमती पूनम जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेचे (MTSE) बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी पालकांनी आपल्या विविध समस्या मांडल्या तसेच शाळेच्या कामाबद्दल  समाधान व्यक्त केले.
 कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महेंद्र भाऊ पारख यांनी पालकांच्या समस्यांना उत्तर दिले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.या कार्क्रमाबद्दल श्री बेबीलालजी संचेती, श्री अजितभाऊ सुराणा, श्री नंदुभाऊ ब्रम्हचा, श्री झुंबरभाऊ भंडारी यांनी अभिनंदन तसेच शुभेच्छा दिल्या आहेत.आभार श्री संतोष मढे सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments