Type Here to Get Search Results !

केदा नाना आहेर यांनी "युवा संवाद मेळावा" देवळा येथे विधानसभेचे रणशिंग फुंकले


देवळा तालुका प्रतिनिधी : कैलास पवार
देवळाः सलग दहा वर्ष म्हणजेच विधानसभेचा दोन टर्मसाठी सर्वानाच काहीतरी दिलेच त्यात आमदारकी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायतसमिती सदस्य, तसेच गावागावात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी सदस्य, चेअरमन, पक्षातील मोठी तसेच तालुक्यातील लोकांसाठी महत्वाची पदे हे सर्व फक्त राजकीय जीवनात देण्याचीच काये केली परंतु देवळा व चांदवड तालुक्यातील जनतेसाठी मी एक हक्काचा माणुस म्हणुन जनता केदानानां कडे पाहत आहे त्यामुळेच पुढील विधानसभेसाठी केदानाना आहेर यांना मोठे पाठबळ देण्यासाठी युवासंवाद मेळाव्याचे आयोजन केदा नाना आहेर मित्र मंडळाने आयोजीत केले होते " अभी नही तो कभी नहीं" असा वज्र निर्धारच यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना मी सदैव आपल्यासोबत मागील काळात ही होतो आताही आहे व यापुढेही फक्त आणि फक्त जनतेच्या अर्थात तुमच्या सेवेसाठीच राहणार अशी ग्वाही आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना दिली. यावेळी समर्थक अर्थात केदानाना प्रेमी समर्थकांनी "केदानाना... आगे बढो हम तुम्हारे साथ है " या घोषनानी सभागृह दणाणुन गेले होते. केदा नाना आहेरांनी स्पष्ट भुमिका केल्याने सर्वच कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला त्यावेळी सर्वच कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट जाणवत होता
युवा संवाद मेळाव्यात केदानाना आहेर यांचेसह मंचावर उपस्थित जितेंद्र आण्णा आहेर, मनोज दादा आहेर , योगेश नानु आहेर, पंकज अहिरराव व अतुल पवार उपस्थित होते व शहरातील सर्व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments