Type Here to Get Search Results !

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चांदवड व सुरगाणा येथे दिनांक 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2024 पर्यंत संपूर्ण राज्यात भगवा सप्ताह चे आयोजन

सदगुरु रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड : आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिनांक 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2024 पर्यंत संपूर्ण राज्यात भगवा सप्ताह चे आयोजन करण्यात आले. 
 दरम्यान गाव तिथे शिवसेना व घर तेथे शिवसैनिक  व राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार असताना सन्माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यातील जनतेसाठी शेतकऱ्यासाठी जे काम त्यांनी केले त्याची उजळणी व शिवसेनेचा भगवा झंजावात घराघरात निर्माण करण्याकरता भगवा सप्ताह दरम्यान शिवसैनिकांनी स्वतःला झोकुन गावागावात कार्यक्रम राबवावे.याच्या आयोजनाकरिता आज चांदवड व सुरगाणा तालुका बैठक जिल्हाप्रमुख नितीन दादा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली , उपजिल्हा प्रमुख रवी काळे, सुरगाणा उपजिल्हाप्रमुख कृष्णा चौधरी, चांदवड तालुका प्रमुख विलास नाना भवर , संगणक तालुकाप्रमुख मोहन भाऊ गांगुर्डे , युवा सेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत देवरे,युवा सेना तालुकाप्रमुख घमाजी सोनवणे,यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीमध्ये चांदवड तालुका संघटक केशव ठाकरे,  शहर प्रमुख प्रसाद प्रजापत, सोमनाथ पगार, सचिन गुड्डू खैरनार, मनोज आप्पा, विक्रम वाकचौरे, बंडू नाना गांगुर्डे, वसंत आहेर, साहेबराव चव्हाण,धीरज संकलेचा, अकबर पठाण, ज्ञानेश्वर आवारे, नाना धनाईत, राजेंद्र शिंदे, तोशिफ मणियार,सौरभ देशमाने, प्रमोद उशीर, विष्णू काका कोतवाल, कळवण गणपत भोये, दामू धुळे, गौतम पीठे, प्रकाश बागुल, दिगंबर बामणे, काळू वार्डे, चंद्रकांत गागोडे, हिराजी गागोंडे,अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments