चांदवडः आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिनांक 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2024 पर्यंत संपूर्ण राज्यात भगवा सप्ताह चे आयोजन करण्यात आले.
दरम्यान गाव तिथे शिवसेना व घर तेथे शिवसैनिक व राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार असताना सन्माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यातील जनतेसाठी शेतकऱ्यासाठी जे काम त्यांनी केले त्याची उजळणी व शिवसेनेचा भगवा झंजावात घराघरात निर्माण करण्याकरता भगवा सप्ताह दरम्यान शिवसैनिकांनी स्वतःला झोकुन गावागावात कार्यक्रम राबवावे. याच्या नियोजनाकरिता आज देवळा व कळवण तालुका बैठक जिल्हाप्रमुख नितीन दादा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली , उपजिल्हा प्रमुख सुनिल पवार, जितेंद्र वाघ,तालुकाप्रमुख बापू जाधव, कळवण अंबादास जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीमध्ये तालुका संघटक प्रशांत शेवाळे, उपतालुकाप्रमुख भरत देवरे, दिपक देवरे, ज्ञानेश्वर देवरे, विजय जगताप, गोरख गांगुर्डे, एस के शिंदे,विजय हिरे, सतीश बोरसे,भाऊसाहेब आहेर ,भास्कर अहिरे, रितेश वाघ, अविनाश देवरे, सचिन पवार, विश्वनाथ गुंजाळ, बाळासाहेब मोरे ,संदीप पवार, राकेश निकम, राजू जगताप व कळवण तालुक्यातील रामदास वाघ, प्रकाश भालेराव, अजय पगार, डॉक्टर बागुल, वसत देसाई, उत्तम मोरे, अशोक जाधव, चंद्रकांत बुटे, विनोद मालपुरे, आरिफ सय्यद, निलेश आहेर ,संजय गायकवाड, बाळासाहेब मोरे , अशोक जाधव, पुंडलिक गायकवाड, देवळा व कळवण तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments