Type Here to Get Search Results !

श्रीमती जे. आर. गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी...

सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड : श्रीमती जे. आर. गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी  करण्यात आली . विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लोहकरे प्रभारी पर्यवेक्षक श्री. के.के. गरूड, सर्व प्राध्यापक शिक्षक ,शिक्षकेतर बंधू-भगिनी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक  संजय लोहकरे होते. लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर अंशुमन ठाकरे, वैशाली शेलार, सानिका न्याहरकर या  विद्यार्थ्यांनी भाषणे केली. शिक्षक मनोगतात मध्ये सांस्कृतिक विभाग प्रमुख नितीन ठाकरे यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या थोर विभूतींच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लोहकरे यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या व्यक्तिमत्त्वापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात संधीचे सोने केले पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीची विद्यार्थिनी छकुली चव्हाण हिने केले तर कार्यक्रमाचे आभार ओम जाधव या विद्यार्थ्याने केले.

Post a Comment

0 Comments