Type Here to Get Search Results !

चांदवड न्यायालय येथे मे.न्यायाधिश एस.बी.माने साहेब यांचे अध्यक्षतेखाली कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

प्रतिनिधी : राजाराम खांगळ उर्फ आर के मामा
चांदवड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय सह दिवाणी तथा कनिष्ठ स्तर प्रथम वर्ग न्यायाधिश एस.बी.माने साहेब यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक २५/०७/२०२४ रोजी दुपारी २.०० वा. कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात वकील बार संघाचे अध्यक्ष ॲड.ठाकरे साहेब यांनी कायदेविषयक महत्त्वाची माहिती सांगितली, सरकारी विधी तज्ज्ञ ॲड. वाळके साहेब यांनी बाल गुन्हेगारीला व बाल मजूरांना कसा पायबंद घालावा. बाल मजूर यांचे जीवनमान सुधारण्यासाठी काय उपाययोजना करावी कशी दखल घ्यावी याबाबत माहिती सांगितली. पंचायत समितीचे बिडीओ साबळे साहेब यांनी लोकसंख्या व लोकशाही जनगणना दिन, महिला बाल संगोपन, बाल कुपोषण व आरोग्य याबद्दल माहिती सांगितली, 
कायदे विषयक मार्गदर्शन शिबीराचे अध्यक्ष सह दिवाणी तथा कनिष्ठ स्तर प्रथम वर्ग न्यायाधिश एस.बी.माने साहेब यांनी कायद्याचे महत्त्व सांगताना पक्षकार बांधवांनी छोटे छोटे स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे  प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. तसेच शेतजमीन वाटपाचे किरकोळ प्रकारच्या कारणांनी दावे दाखल करून सतत दाव्यांची संख्या वाढत आसल्याने वर्षानुवर्ष दावे वाढत्या कामकाजाच्या प्रमाणात प्रलंबित रहातात. दावे दाखल करणाऱ्या वादी- प्रतिवादी यांना वर्षानुवर्ष न्यायालयात चकरा माराव्या लागतात. वेळ वाया जातो. पैसा खर्च होतो. शेतजमीन वाटपात किरकोळ कारणांनी भावा-बहिणींमध्ये दुरावे निर्माण होऊन वैर वाढतात. शेतजमीन वाटपाचे कारणे पुढे येत आई-वडिलांना सांभाळणारे अपत्य यांचेत वादविवाद होतात. या मतभेदातून, वादातून  आई-वडिलांचा सांभाळ न केल्याने त्यांच्याही खावटीचा, पालनपोषणाचा प्रश्न निर्माण होतो. कायद्याच्या तरतुदीनुसार आई-वडिलांच्या पालन पोषणासाठी अपत्यांना खावटी द्यावीच लागते. त्यामुळे असे किरकोळ मत भिन्न चुका करून दावे दाखल न करता आपापसात वाद संपुष्टात आणावेत. ज्या पक्षकारांनी असे किरकोळ कारणावरून दावे दाखल केलेले असतील त्यांनी असे दावे लोक अदालत दिनाच्या दिवशी समजुतीने मिटतात. निकाली काढले जातात. एकमेकांचे वैर संपुष्टात येतात. खर्च होणारा पैसा, वेळ वाचतो. असे फायदे होऊन आपुलकीचे नाते तयार होतात. व वादी-प्रतिवादी दोघांनाही समान न्याय मिळतो. असे कायदे विषयक शिबिरात महत्त्वाचे मार्गदर्शन करून येत्या २७/०७/२०२४ या तारखेला चांदवड न्यायालयात लोक अदालत दिन आयोजित करण्यात आलेला असुन या दिवशी समजुतीने वादी प्रतिवादी यांनी समजुतीने दावे निकाली काढण्यास, मिटविण्यास विचार करावा व लोक अदालत दिनाच्या दिवशी आपल्या अनुभवी तज्ज्ञ वकिलांच्या उपस्थितीत हजर रहाण्यास सूचित करून मोलाचे मार्गदर्शन केले.
सदर शिबिरासाठी २ रे सह दिवाणी तथा कनिष्ठ स्तर प्रथम वर्ग न्यायाधिश डि.एस.निंबाळकर साहेब, पंचायत समितीचे बिडीओ साबळे साहेब, सरकारी विधी तज्ज्ञ ॲड. वाळके साहेब, तसेच वकील बार कौन्सिल चांदवड असोशियनचे अध्यक्ष ॲड. दिनकरराव ठाकरे साहेब, उपाध्यक्ष  पटेल वकील साहेब, सचिव ॲड. शिवाजीराव सोनवणे साहेब, चांदवड न्यायालयातील सर्व अनुभवी वकील बांधव, न्यायालयीन सर्व कर्मचारी वर्ग आणि महिला पुरुष पक्षकार उपस्थित होते. 
या शिबिरात चांदवड न्यायालयातील बार कौन्सिल असोशियनचे ॲड. पंकज काळे साहेब यांनी सुव्यवस्थित सूत्र संचालन करून सर्वांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण माहितीवर चर्चा करून मा.अध्यक्ष सह दिवाणी तथा कनिष्ठ स्तर प्रथम वर्ग न्यायाधिश एस.बी.माने साहेब यांनी राष्ट्रगीत घेऊन कायदे विषयक  शिबिराची सांगता केली.

Post a Comment

0 Comments