Type Here to Get Search Results !

रेणुका कॉलनी चांदवड येथे आषाढी एकादशी उत्साहाने साजरी

 सदगुरू रक्षा न्युज महाराष्ट्र :
चांदवड : रेणुका कॉलनी चांदवड येथे आषाढी एकादशी उत्साहाने साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने कॉलनीतील लहान मुलांनी विठ्ठल रुक्माई ची वेशभूषा परिधान केली, विठ्ठल रुक्माई यांच्या वेशभूषेत असणारे दिशा प्रजापत हर्ष प्रजापत आर्या शिर्के समर्थ सोनवणे व इशी सोनार यांचे स्वागत सौ बेबीबाई ओस्तवाल परिवार यांनी केले तसेच सर्व महिलांनी वेशभूषेतील बाळ गोपाळां समवेत दिंडी काढली तत्तपश्चात सौ रेखा शुक्ला यांचे श्री भैरवनाथ आदर्श महिला भजनी मंडळ यांनी कॉलनीतील श्री मोरारजी झुंबरलालजी ओस्तवाल यांच्या नूतन वास्तुत विविध भजने सादर केली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंजुषा ओस्तवाल राधाबाई सोनवणे शितल चतुरमुथा संगीता बोरा भावना छाजेड चंचल गुळेचा किरण सुराणा अलका छोरीया सौ. सुनिता कोठारी कु.मेघा बोरा सौ.मंगला जाधव सौ रूक्मिणी सोनवणे किमया ओस्तवाल मिना प्रजापत अशोक सोनवणे संतोष सुराणा आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments