चांदवड:- श्री नेमिनाथ जैन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करण्यात आलेल्या सीड बॉलचे रोपण करून पर्यावरण विषयक जनजागृती निर्माण केल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
सामाजिक वनीकरण विभाग चांदवड आणि विद्यालयातील हरित सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अश्विनी सोमवंशी वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग चांदवड यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यालयातील विद्यार्थ्यांना सीड बॉल रोपण व वृक्ष लागवड करण्यात आली.
गतवर्षामध्ये आपल्याला वाढत्या तापमानाच्या खूप मोठ्या प्रमाणात झळा सोसाव्या लागल्या आहेत. पावसाचे प्रमाण वाढावे आणि पर्यावरणाचा समतोल राखला जावा. तसेच जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी सर्वांनीच अधिकाधिक स्वदेशी वृक्ष लावले पाहिजेत यासाठी विद्यालयाचे हरित सेना विभाग प्रमुख रोशन नेरकर यांनी विद्यार्थ्यांना सीड बॉल तयार करण्याची प्रक्रिया समजावत विद्यार्थांना सीड बॉल तयार करण्यास सांगितले आणि वृक्षारोपणा प्रती विद्यार्थ्यांना प्रेरित करून त्यांनी स्वतःच वड,चिंच,जांभूळ,कडुलिंब, आंबा या सारख्या देशी बियांचे बनविलेले सीड बॉल रोपण करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांच्या हस्ते शिसम ह्या स्वदेशी झाडाचे देखील रोपण करण्यात आले.
यावेळी विद्यालयाच्या प्राचार्य यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने घरी जाऊन देखील स्वदेशी प्रजातीच्या झाडाचे रोपण करून त्याचे संवर्धन करावे असे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांसमवेत विद्यालयातील उपशिक्षक हर्षद पोलगीर, प्रियंका मोरे यांच्या सह वनभोजनाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आले.
या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयक घोषणा देत जनजागृती केली.
विद्यालयाच्या या पर्यावरण पूरक उपक्रमाचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण आणि सीड बॉल रोपण केल्याबद्दल विद्यालयाचे उपप्राचार्य संदिप समदडिया, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील, ज्येष्ठ शिक्षक देवेंद्रराज जैन यांच्या सह विद्यालयातील सर्वच घटकांनी अभिनंदन केले.
_सामाजिक वनीकरण विभाग व श्री नेमिनाथ जैन विद्यालयातील हरीत सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सीडबॉल रोपण व वृक्षारोपण करताना अश्विनी सोमवंशी वनरक्षक, प्राचार्य शिवदास शिंदे, हरित सेना प्रमुख रोशन नेरकर, उपशिक्षक हर्षद पोलगीर, प्रियंका मोरे व सहभागी विद्यार्थी_
Post a Comment
0 Comments