चांदवड:- श्री नेमिनाथ जैन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त करत यश संपादित केल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
नौरोसजी वाडिया महाविद्यालय पुणे यांच्यातर्फे दरवर्षी संपूर्ण देशभरात महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचा आयोजन केले जाते. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये पुढील प्रमाणे विद्यार्थी उत्तीर्ण होवून शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत.
इयत्ता 8 वी मधून सक्षम साहेबराव बच्छाव जिल्हास्तरीय पारितोषिक,
चैतन्य संजय पाटील विशेष पारितोषिक, सार्थक रवींद्र ठाकरे तालुका पारितोषिक, प्रवीण भैरवनाथ धायगुडे उत्तेजनार्थ पारितोषिक तर इयत्ता 9 वी तील स्वरूप मनोज सोनवणे विशेष पारितोषिक, वेदांत प्रभाकर ठाकरे तालुका पारितोषिक,अविष्कार संजय ठाकरे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवत शिष्यवृत्तीस प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर इतर 45 विद्यार्थ्यांना विशेष सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
विद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी व प्रशासकीय अधिकारी प्रमोद गाळणकर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
विद्यालयाच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, महेंद्र पारख यांनी विद्यार्थ्यांच्या आणि विद्यालयाचे अभिनंदन केले.
गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख गंगाधर खैरनार यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
परीक्षेच्या निकालाबद्दल विद्यालयाचे उपप्राचार्य संदिप समदडिया, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील, ज्येष्ठ शिक्षक देवेंद्रराज जैन यांच्यासह सर्वच घटकांनी आनंद व्यक्त केला.
Post a Comment
0 Comments