Type Here to Get Search Results !

नेमिनाथ जैन विद्यालयाचे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश....

सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड:- श्री नेमिनाथ जैन विद्यालयातील 8 विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तालुका व जिल्हा गुणवत्ता यादीत पात्र झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी बच्छाव सक्षम साहेबराव तालुक्यात प्रथम जिल्हात 13 वा, ठाकरे सार्थक रवींद्र तालुक्यात द्वितीय जिल्ह्यात 14 वा, पाटील चैतन्य संजय तालुक्यात तृतीय जिल्ह्यात 23 वा, गुळेचा मोक्षा संदीप तालुक्यात चतुर्थ जिल्ह्यात 38 वी, धायगुडे प्रवीण भैरवनाथ तालुक्यात पाचवी जिल्ह्यात 53 वी, डुंगरवाल अनुष्का प्रितम तालुक्यात 7 वी जिल्ह्यात 104 वी, रकिबे पूजा दिलीप तालुक्यात आठवी जिल्ह्यात 117 वी, तर इयत्ता 5 वी मधून यश शंकर ठाकरे हे विद्यार्थी देखील परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवत शिष्यवृत्ती पात्र झालेले आहेत.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी, प्रशासकीय अधिकारी प्रमोद गाळणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यालयाच्या या उज्वल निकालाबद्दल विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख,महेंद्र पारख यांनी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक कौतुक केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे उपशिक्षक पवन अग्रवाल, योगेश सोनजे, संतोष मते, रोहित सोनवणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 
विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विद्यालयाचे उपप्राचार्य संदिप समदडिया,पर्यवेक्षक रामचंद्र पाटील, ज्येष्ठ शिक्षक देवेंद्रराज जैन यांच्यासह सर्वच घटकांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments