चांदवड - भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत श्री नेमिनाथ जैन विद्यालयाने यश मिळविले अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वाघोली, पुणे व श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स (पंचम झोन) नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान महावीर स्वामी जन्म कल्याण महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत श्री नेमिनाथ जैन विद्यालयाचा विद्यार्थी ओम भास्कर गांगुर्डे याने आधुनिक भारतात भगवान महावीर स्वामी यांच्याशी शिकवणीचे महत्व यावर चित्र साकारून प्रथम क्रमांक मिळविला. या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र, रुपये 1501 रोख व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यशवंत विद्यार्थ्यांचे आणि विद्यालयाचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी अभिनंदन केले. विजयी ओम गांगुर्डे यास विद्यालयाचे कलाशिक्षक काशिनाथ अहिरे यांनी मार्गदर्शन बहुमोल केले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल विद्यालयाचे उपप्राचार्य संदिप समदडिया पर्यवेक्षक रामचंद्र पाटील, ज्येष्ठ शिक्षक देवेंद्रराज जैन यांच्यासह सर्वच घटकांनी आनंद व्यक्त केला.
Post a Comment
0 Comments