Type Here to Get Search Results !

जागतिक पर्यावरणदिन पंधरवाड्याचे व शाळेचा पहिला दिवस याचे औचित्य साधुन तिसगांवच्या इ.१० वीच्या विद्यार्थ्यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय तिसगांव येथे वृक्षदान.

सदगुरू रक्षा न्युज : कैलास सोनवणे (दिघवदकर )
चांदवड/नाशिक:- आज दि.१५ जुन २०२४ रोजी क्रांतीज्योती महात्मा ज्योतीबा फुले शिक्षण संस्था,दुगांव ता.चांदवड संचलित श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय,तिसगांव ता.चांदवड येथे सन २०२३-२४ शैक्षणिक वर्षात दहावी शालान्त परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी आठवण म्हणून आपल्याच शाळेस १५१ वृक्ष भेट दिली.
गतवर्षी भयावह दुष्काळ सदृश्य परिस्थितीत तालुक्यातील अनेक गावात आपलेही गांव होळपरलेल्या गावात झाडांची संख्या कमी झाली,झाडे कमी झाली की पाऊस कमी पडतो हे बघता यावर्षीच्या १० वी च्या विद्यार्थ्यांनी आदर्श उपक्रम म्हणून ज्या शाळेत इतकं शिकलो ह्याची कृतज्ञता म्हणून आपण निसर्गाचे काही तरी देणं लागतो तर आज शाळेचा पहिला दिवस व १०वी च्या विद्यार्थ्यांचा शेवटचा दिवस म्हणून त्या शाळेस आठवण म्हणून १५१ वृक्ष दान करावे हा अभिनव संकल्पपूर्ती करण्यात आली. 
यावेळी याच शाळेचे माजी विद्यार्थी तथा संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी संस्थान,त्र्यंबकेश्वरचे विश्वस्त श्री ह भ प नवनाथ महाराज गांगुर्डे, गावच्या प्रथम नागरिक अर्थात महिला सरपंच सौ मिराताई संजय गांगुर्डे,शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन श्री दादा कारभारी गांगुर्डे,व्हा.चेअरमन श्री शिवाजी नामदेव निकम,तिसगांव सोसायटीचे चेअरमन श्री गोकुळ नाना गांगुर्डे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य काशिनाथ चिंधा गांगुर्डे,उत्तम पांडुरंग गांगुर्डे, भगवान खंडेराव खैरे,निवृत्ती गोविंदा गांगुर्डे, संजय भिकाजी गांगुर्डे,भुषण संजय गांगुर्डे, बाळासाहेब रामदास गांगुर्डे,राजेंद्र दादा गांगुर्डे,या कार्यक्रमाचे आयोजित शाळेचे नवनियुक्त कर्तृत्ववान मुख्याध्यापक श्री संजय गोपीनाथ खैरे सर,जेष्ठ शिक्षक श्री मंडलिक सर, श्री पवार सर, गोरख गांगुर्डे व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते, 
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न झाले. यावेळी बोलतांना मुख्याध्यापक श्री खैरे सर यांनी गाव आणि शाळा यांचे संबंध विद्यार्थी विकासक असले की किंवा शाळेत गांव की गावात शाळा यातून शाळेचा निश्चितच कायापालट होईल, ही संकल्पना सर्वांनी मनात ठेवावी अशी आशा बोलुन दाखवली यावेळी मान्यवरांच्या वतीने नवनियुक्त मुख्याध्यापक खैरे सर यांचा गावाच्या वतीने सत्कार करण्याची सुचना शाळेचे माजी विद्यार्थी नवनाथ महाराज गांगुर्डे यांनी मनोगतात मांडली, यावेळी सरपंच,सर्व मान्यवरांच्या हस्ते खैरे सरांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे माजी विद्यार्थी श्री भुषण संजय गांगुर्डे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments