नासिक येथील पत्रक वाटण्याच्या घटनेच्या निषेधार्थ देवळा तालुका रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आ) वतीने पोलीस स्टेशन, देवळा येथे निवेदन
June 22, 2024
0
देवळाः नाशिक पंचवटी येथील काळाराम मंदिर परिसरात युवा हिंदू वहिनी समितीचा समाजकंटक प्रथमेश संदीप चव्हाण नामक माथेफिरूने संघटनेच्या लेटहेडवर आंबेडकरी समाजाबद्दल अतिशय वाईट लिखाण करून परिसरात वाटप केले तरी या सगळ्या प्रकाराबद्दल आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत त्यामुळे त्याचे पडसाद नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून या प्रकरणाला हिंसक वळण लागण्याच्या आधी सदर समाजकंटकावर लवकरात लवकर कठोर कारवाई करून ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करावा असे आशयाचे पत्रक देवळा तालुका येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने देवळा पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम जाधव यांना निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव शांताराम पवार तालुका अध्यक्ष कैलास रमेश पवार , नगरसेवक कैलास पवार, माजी तालुका अध्यक्ष सुधाकर पवार, शहराध्यक्ष प्रदीप पवार, मातंग आघाडीचे संजय पानपाटील, सुनील साबळे, चर्मकार समाजाचे उल्हास गुजरे, पुंडलिक माळी आदींसह दयानंद पवार, राजू जगताप, किरण गांगुर्डे, समाधान पवार, गणेश सोनवणे, स्वप्निल पवार, कल्पेश पवार,प्रतीक पवार शुभम अहिरे योगेश अहिरे सनी पवार भाऊसाहेब अहिरे बाळकृष्ण खरे राकेश साळवे स्वप्निल पवार, टोनी युवराज पवार, कैलास गरुड आदिसह सर्व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments