Type Here to Get Search Results !

श्री नेमिनाथ जैन विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात ..... विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पहिल्याच दिवशी मिळाल्याने चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच.

{ सदगुरु रक्षा न्युज :सुनिलआण्णा सोनवणे }
चांदवड:- ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा....
नवीन पाठ्यपुस्तक मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद...
श्री नेमिनाथ जैन विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव आनंदात साजरा झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.

मे महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर पुन्हा एकदा शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरू होत आहे. विद्यालयात पहिल्याच दिवशी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे, उपप्राचार्य संदीप समदडिया, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील, ज्येष्ठ शिक्षक सुनील बुरड, देवेंद्रराज जैन ज्येष्ठ शिक्षिका दुर्गा शाकद्वीपी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करत गुलाबपुष्प आणि नवीन पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले
यावेळी विद्यालयाच्या प्राचार्य शिवदास शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी येत्या शैक्षणिक वर्षात भरपूर अभ्यास करून उज्वल भविष्य घडवावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
तर विद्यालयाचे उपप्राचार्य संदीप समदडिया यांनी शैक्षणिक वर्ष आणि शिस्त या बाबत उपस्थित विद्यार्थी आणि पालक यांना मार्गदर्शन केले.
शाळा प्रवेशोत्सवाच्या दिवशीच विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके आणि मीष्टान्न भोजन मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
विद्यालयाच्या या नवोपक्रमाचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी कौतुक केले.
विद्यालयात विद्यार्थी उपस्थित झाल्याने विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर सहकारी यांनी आनंद व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments