चांदवड:- श्रीमती जे.आर. गुंजाळ माध्य. व उच्च माध्यमिक चांदवड विद्यालयात विद्यार्थीप्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस. एन. लोहकर, उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख श्री खुळे सर, वरिष्ठ शिक्षक कापडणे सर, श्रीमती ठाकरे मॅडम, श्रीमती निकम मॅडम उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री एस. एन. लोहकरे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री. डी. वाय. काळे यांनी केले. विद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे गीतमंचाने स्वागत केले. विद्यालयाचे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एन. लोहकरे केंद्रप्रमुख संदीप महाले यांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले
तसेच नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे माननीय मुख्याध्यापकांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस. एन. लोहकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यालयात राबवल्या जाणाऱ्या विविध शालेय व सहशालेय उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती लता राजगुरू यांनी केले. तर कार्यक्रमास कार्यक्रमाचे आभार श्री डी. वाय. काळे यांनी केले.

Post a Comment
0 Comments