चांदवड:- श्री नेमिनाथ जैन विद्यालयाच्या भूमिका सचिन आवरे या विद्यार्थिनीने तामिळनाडू येथे झालेल्या एन.सी.सी.चे ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
श्री नेमिनाथ जैन विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विभाग आणि स्पर्धा आयोजित केले जातात. त्या अनुषंगाने विद्यालयात कार्यरत असणाऱ्या एन.सी.सी.ची इयत्ता 8 वी ची विद्यार्थिनी कु. भूमिका सचिन आवारे हिने तामिळनाडू राज्यातील निलगिरी येथे एन.सी.सी. गटातील आयोजित गर्ल्स ट्रेकिंग मोहीम 2024 यशस्वीरित्या पूर्ण केल्याने विद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे.
विद्यालयाच्या या यशाबद्दल विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी आपल्या अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर यशस्वी विद्यार्थिनीला विद्यालयाचे एन.सी.सी. विभाग प्रमुख राजेश चव्हाण यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल विद्यालयाचे उपप्राचार्य संदिप समदडिया पर्यवेक्षक रविंद्र पवार यांच्यासह सर्व घटकांनी कौतुक केले.
Post a Comment
0 Comments