चांदवड:- श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 10 वी च्या परीक्षेत सूयश संपादित करणारे विद्यार्थ्यांचा संस्थेच्या सन्माननीय व्यवस्थापन समितीतर्फे सत्कार करण्यात आले याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम (जैन गुरुकुल) च्या व्यवस्थापन समितीतील सन्माननीय सदस्य तसेच श्री नेमिनाथ जैन विद्यालयाचे समन्वयक शांतीलालजी अलीझाड आणि झुंबरलाल भंडारी यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत आयोजित एस.एस.सी. परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत संपादित करून विद्यालयाचे नाव उज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा कौल समजावून घेत आपल्या करिअरची सुरुवात करावी. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या बरोबरीनेच माता पिता आणि वडीलधाऱ्या व्यक्तीचा आदर करत संस्कारक्षम जीवन घडवावे असे आवाहन करण्यात आले. तसेच 10 वी आणि 12 वी नंतर विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या अनेक शैक्षणिक संधी आपल्या संस्थेत उपलब्ध आहेत. याविषयी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यालयाच्या नावलौकिकात भर टाकणाऱ्या या विद्यार्थ्यांचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक महावीर पारख, महेंद्र पारख यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
या गुणगौरव कार्यक्रमाप्रसंगी 10 वी च्या परीक्षेत विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच विद्यालयातील 10 वी ला अध्यापन करणारे शिक्षक वृंद उपस्थित होते.
विद्यालयाच्या या उत्कृष्ट निकालाबद्दल विद्यालयाचे उपप्राचार्य संदिप समदडिया पर्यवेक्षक रविंद्र पवार यांच्यासह सर्वच घटकांनी आनंद व्यक्त केला.
Post a Comment
0 Comments