मृगाचा पाऊस वेळेवर त्याचप्रमाणे चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने पेरण्यांना वेग.
June 13, 2024
0
चांदवड : तालुक्यात ठीक ठिकाणी पेरणी लायक पाऊस झाल्याने काही गावांमध्ये पेरणीला सुरुवात झाली आहे गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला होता पावसाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती तेव्हा काही पिके उगवली तर काही उगवलेली पिके करपून गेली होती त्यामुळे चालू वर्षात शेतकरी पेरणीला एक पाऊस झाल्याशिवाय पेरणी करण्यास धजावत नाहीज्या गावांना चांगला पाऊस झाला तेथे सोयाबीन भुईमू उडीद मुंग मका बाजरी अदि कडधान्येचे पेरणी करण्यात येत आहे तर काही शेतकरी तळ्यात असलेल्या पाण्यावर व बाहेरील तालुक्यातून टँकरद्वारे पाणी आणून टोमॅटो मिरची कोबी व भाजीपाल्याची लागवड करत आहेत तीन-चार दिवसात ठीक ठिकाणी पाऊस झाला असला तरी विहिरी कोरड्या ठाक आहे येणाऱ्या पावसावर शेतकरी पेरणी करीत आहे पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना आनंद झाला आहे गेल्या वर्षी दुष्काळ डोळ्यापुढे ठेवून शेतकरी पिके उभे करू पाहत आहे या भागात पावसाचे प्रमाण कमी असून ते शेतकरी शेती मशागत करत आहेत नांगरट झालेल्या शेतीची मशागत करून पेरणी साठी तयार करण्यात व्यस्त आहे पावसामुळे ठीक ठिकाणी पेरणी मागेपुढे होत आहेत गावागावातील शेतात पेरणी व मशागतीसाठी बैलांपेक्षा यांत्रिकी अवजारे जास्त प्रमाणात दिसून येत आहेत झटपट मशागत व पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करण्यात येत आहे त्यामुळे ट्रॅक्टर अवजारे असलेल्या शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे
Tags
Post a Comment
0 Comments